महापौर सतीश कुलकर्णी म्हणाले, `हे लगेच बंद करा, अन्यथा...` - Mayor Kulkarni ordered NMC Officers stop This Immidiatly | Politics Marathi News - Sarkarnama

महापौर सतीश कुलकर्णी म्हणाले, `हे लगेच बंद करा, अन्यथा...`

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

शहराला पाणी पुरवठा होतो. मात्र या बंधा-यात सध्या पाणी कमी अन् सांडपाणीच अधिक दिसत होते. ते पहावतच नव्हते. त्यामुळे महापौरांनी हे तातडीने बंद करा. परिस्थितीत सुधारणा करा, अन्यथा कारवाई करावी लागेल, असा इशाराच त्यांनी दिला.

नाशिक रोड : भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक बुधवारी महापौर सतीश कुलकर्णी यांना चेहेडी बंधारा येथे घेऊन गेले. येथून शहराला पाणी पुरवठा होतो. मात्र या बंधा-यात सध्या पाणी कमी अन् सांडपाणीच अधिक दिसत होते. ते पहावतच नव्हते. त्यामुळे महापौरांनी हे तातडीने बंद करा. परिस्थितीत सुधारणा करा, अन्यथा कारवाई करावी लागेल, असा इशाराच त्यांनी दिला. 

यावेळी नगरसेवकांनी त्यांना चेहेडी साठवण बंधारा येथील स्थिती दाखवली. या पाण्याजवळ उभे राहून दाखवा, ते अशक्य आहे. मग हे पाणी  प्यायचे कसे असा प्रश्न नगरसेवकांनी केला. ती स्थिती पाहून महापौर कुलकर्णी देखील अस्वस्थ झाले.  चेहेडी येथील दारणा नदीत वालदेवी नदीचे दूषित पाणी मिसळत असल्याने दूषित आणि अळ्या असलेल्या पाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्या पार्श्‍वभूमीपर महापौर सतीश कुलकर्णी यांनी चेहेडी बंधाऱ्याला आणि जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. तेथील स्थिती एव्हढी गलिच्छ होती, की त्वरित दूषित पाणी मिसळणे बंद करण्याच्या सूचना महापालिका यंत्रणेला दिल्या.

भगुर, देवळाली कॅम्प आणि नाशिक रोडला नदीपात्रात सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे दारणा नदीमधून चेहेडी बंधाऱ्यापर्यंत येणाऱ्या पाण्यात किड अळ्या दिसतात. त्यामुळे नाशिक रोडकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यांना नाशिक हुन चाळीस ४० एमएलडी पणी येते त्याच दारणा नदीचे ३० एमएलडी पाणी मिसळतात. दारणा नदी मध्ये दूषित वालदेवी नदीचे पाणी सोडणे बंद करा. गांधीनगर येथून पाइपलाइन टाकणे किंवा चेहेडी पंपिंगला नवीन वाहिणी (इंटेक वेल) बारा बंगला पासून गांधीनगर, व गांधीनगर ते नाशिक रोड दरम्यान जलवाहिनी टाकावी.

दारणा नदीवरील बंधारा व त्यातील समस्यांमुळे नगरसेवकांनी नाशिक रोड परिसरासाठी दारणा ऐवजी गंगापूर धरणातून पाणीपुरवठा करण्यात यावा. बारा बंगला ते गांधी नगर  दरम्यान १२००  एमएल क्षमतेची नवीन जलवाहिनी टाकावी. गांधी नगर ते नाशिक रोड नवीन ९०० एमएलची जलवाहिनी टाकावी. पाण्यातील अळ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी कायमस्वरुपी उपाय योजना कराव्यात अशी मागणी केली. 

दरम्यान, महापौरांनी दारणा नदीपात्रातून नाशिक रोडसाठी जे पाणी हा नाशिक रोड भागातील दारणेकाठच्या नागरिकांचा हक्क आहे. सध्या पाणी खराब आहे म्हणून ते उचलायचेच नाही असे करता येणार नाही. नाशिककरांचा दारणेच्या पाण्यावरील हक्क सोडता येणार नाही. किमान 150 दिवस चांगले पाणी उपलब्ध होते. बारा बंगल्यावर पुरसे पाणी आहे, फक्त पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी आहे त्यासाठी जलवाहिनी टाकली जाईल. पण नाशिककरांचा पाण्याचा हक्क सोडता येणार नाही, असे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. 

यावेळी ज्येष्ठ नगरसेवक संभाजी मोरुसकर, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, पंडित आवारे, प्रा. शरद मोरे, संगीता गायकवाड, पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, शिवाजी चव्हाणके, उपअभियंता अविनाश भोये, राजेश पालवे, विभागीय अधिकारी डॉ. दिलीप मेनकर, बापु सातपुते आदी उपस्थित होते.
....
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख