नाशिककर गोंधळले...`हे महापौर आहेत की आध्यात्मिक गुरू!` - mayor Kulkarni is in Adhyatmik guru`s Role, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

नाशिककर गोंधळले...`हे महापौर आहेत की आध्यात्मिक गुरू!`

संपत देवगिरे
सोमवार, 19 एप्रिल 2021

शहरातील ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची मागणी व पुरवठा यांचा ताळमेळ बसत नसल्याची कबुली देताना महापौर सतीश कुलकर्णी यांनी प्राथमिक लक्षणे दिसताच त्वरित उपचार सुरू करण्याचा सल्ला देताना आत्मविश्वास वाढविण्याचा सल्ला दिला आहे.

नाशिक : शहरातील ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची मागणी व पुरवठा यांचा ताळमेळ बसत नसल्याची कबुली देताना महापौर सतीश कुलकर्णी यांनी प्राथमिक लक्षणे दिसताच त्वरित उपचार सुरू करण्याचा सल्ला देताना आत्मविश्वास वाढविण्याचा सल्ला दिला आहे.

त्याचबरोबर प्राणायम, योगा सातत्याने करण्याचे आवाहन नाशिककरांना करताना राजकीयतून ते आध्यात्मिक भूमिकेत आले आहेत. कोरोनाचा संसर्ग वाडल्यावर स्लीपींग मोडमध्ये गेलेले महापौर सतत वेगवेगळे सल्ले देत गोंधळलेले असल्याचे संकेत देत होते. त्यांच्या नव्या सल्ल्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. 

महापौर कुलकर्णी यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून, प्राथमिक लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी यापैकी कुठल्याही पॅथीनुसार त्वरित उपचार सुरू करावेत. त्याआधी त्यांनी केवळ आर्युवेदीक उफचारांवर भर द्यावा असा सल्ला दिला होता. त्यानंतर नाकातून गरम पाणी घेण्याचा फायदा होतो, असेही सांगितले होते. आता ते ॲन्टिजेन किंवा आरटीपीसीआर टेस्ट करून रिपोर्ट यायला वेळ असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू करावा. आरटीपीसीआरचा रिपोर्ट येण्यास विलंब होत असल्याने तत्काळ उपचार सुरू केल्यास कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होते. कोरोनाच्या कालावधीत भीतीला दूर ठेवता येईल. तेवढे उपचाराने बरे होता येईल. कोरोनाची लक्षणे दिसली तरी घाबरून जाऊ नका, कोरोनाचा आजार नक्की बरा होतो. नाशिककरांनी आत्मविश्वास ठेवावा, भीती निर्माण झाल्यास हृदयाचे ठोके वाढतात. यामुळे अधिक त्रासाला सामोरे जावे लागते. होमिओपॅथी, आयुर्वेदिक व ॲलोपॅथी ही औषधे विनाविलंब सुरू केल्यास आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढून आपला आत्मविश्वासही वाढतो, असा दावा त्यांनी केला आहे. 

खरे तर शहरातील नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांसह महापालिकेचे सर्व पदाधिकारी व अधिकारी अपवाद वगळता कोणीही नागरिकांत जात नाहीत. नागरिकांचे प्रबोधन, त्यांना धीर देण्याच काम कोणीही करतांना दिसत नाही. त्यामुळे खरे तर आत्मविश्वास नागिरकांचा वाढला आहे, की लोकप्रतिनिधींचा, असा प्रश्न निर्माण होतो.  .

प्राणायम, योगा करा
प्राथमिक स्वरूपातच कोरोनावर उपचार करून पायबंद घातल्यास स्वत:बरोबरच कुटुंब बाधित होणार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण रोज सकाळी वेळ देऊन प्राणायाम व आयुर्वेदात सांगितलेली जलनेती क्रिया केल्यास कोरोनाला नक्कीच दूर ठेवता येईल. पुणे येथील पं. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हा प्रयोग सातत्याने केला जात असून, त्या रुग्णालयाच्या ६०० कर्मचाऱ्यांना अद्याप कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. यासाठी जलनेती क्रिया, प्राणायाम तसेच शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी औषधे घेतल्यास कोरोनासारख्या महाभयंकर आजारास आपण दूर ठेवू शकतो, असे महापौर कुलकर्णी यांनी सांगितले.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख