शिपायाच्या पत्नीमुळे कार्यालय बंद; तर मुख्याधिकाऱ्यांचे काय?

नगर परिषदेच्या कार्यालयातील शिपायाच्या पत्नीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याचा कार्यालयाने एवढा धसका घेतला, की थेट नगर परिषदेच्या कार्यालयाला टाळे लावण्यात आले. या प्रकरणाची एवढी चर्चा सुरू झाली, की कर्मचारी म्हणाले, शिपायाचा एवढा धसका, तर मुख्याधिकाऱ्यांचे काय..?
शिपायाच्या पत्नीमुळे कार्यालय बंद; तर मुख्याधिकाऱ्यांचे काय?

नांदगाव : येथील नगर परिषदेच्या कार्यालयातील शिपायाच्या पत्नीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याचा कार्यालयाने एवढा धसका घेतला, की थेट नगर परिषदेच्या कार्यालयाला टाळे लावण्यात आले. या प्रकरणाची एवढी चर्चा सुरू झाली, की कर्मचारी म्हणाले, शिपायाचा एवढा धसका, तर मुख्याधिकाऱ्यांचे काय..? कारण येथील मुख्याधिकारीदेखील नाशिकहून अप-डाउन करीत असल्याचे बोलले जाते. एकूणच कोरोना आता नांदगाव शहरात धास्तीचा विषय ठरला आहे. 

येथील नगर परिषदेतील शिपाई रोज येवला येथून नोकरीसाठी ये-जा करतो. रविवारी त्याच्या पत्नीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याची सोमवारी सकाळी नगर परिषदेच्या कार्यालयाला माहिती मिळाली. पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह निघाल्याने काय करायचे, या विचारात प्रशासनातील सर्वच अधिकारी चिंतेत होते. विचारविनिमय केल्यानंतर त्यांनी नगर परिषदेच्या संपूर्ण कार्यालयालाच टाळे लावण्याचा निर्णय घेतला. कारण असे सांगितले, की हा शिपाई रोज येवल्याहून अप-डाउन करतो. त्याच्या येवलास्थित पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शिपायाचाही स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आला. संबंधित कर्मचारी शिपाई असल्याने कार्यालयातील प्रत्येक टेबलवरील कर्मचारी, अधिकारी व नागरिकांशी त्याचा संबंध येतो. धोका कोण पत्करणार, असे या वेळी सांगण्यात आले. मात्र इतरांच्या स्वॅब नमुन्याच्या तपासणीचे काय करायचे, हा नवा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे सोमवारी दिवसभर तो चिंता व चर्चेचा विषय ठरला. अर्थात, एका शिपायाची परगावी राहणारी पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संबंध पालिकेच्या कार्यालयाला टाळे लावण्याचा प्रसंग पहिल्यांदाच आला असावा. 

दोन महिन्यांत शहरात पहिल्यांदा कोरोना रुग्ण आढळले. यातील चार जणांचा मृत्यू झाला. या परिस्थितीत पाणी सोडणारा असो की, साफसफाई करणारे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, कार्यालयीन अधिकारी यांनी कोरोना प्रतिबंधक साधनांचा शास्त्रीय पद्धतीने वापर करून शहराला सेवा दिली व स्वत:ला सुरक्षित ठेवले. मात्र अचानक येवलामार्गे नगर परिषदेचा दरवाजा ठोठावणाऱ्या कोरोनामुळे प्रशासनाने तातडीने नगर परिषदेची इमारतच सील केली. सर्वांना आता त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. मात्र त्याचबरोबर अप-डाऊन करणाऱ्यांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. नगर परिषदेच्या मुख्याधिकारीच नाशिकहून अप-डाउन करतात. त्यांचे काय करायचे? हा प्रश्‍न कोरोनाने निर्माण केला आहे. तो मात्र चर्चेचा विषय ठरला आहे. 
.... 
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=-MCHEjIMfxQAX8IicAh&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=1bb6f9ccb1d3ab7d63991f9781d72467&oe=5F2911A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com