Marter sachin more`s pupils education responsiblity taken by hire family | Sarkarnama

दिलासादायक : शहीद सचिन मोरेंसह शहीदांच्या पाल्यांचे शिक्षण हिरे करणार!

संपत देवगिरे
सोमवार, 29 जून 2020

भारत-चीन सीमेवर गलवान खो-यात झालेल्या दुर्घटनेत साकुरी झाप (मालेगाव) येथील सचिन मोरे हा सैनिक शहीद झाला. त्याच्या कुटुंबातील पाल्यांच्या शिक्षणाची संपुर्ण जबाबदारी महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समितीतर्फे पूर्ण करण्यात येणार आहे.

नाशिक : भारत-चीन सीमेवर गलवान खो-यात झालेल्या दुर्घटनेत साकुरी झाप (मालेगाव) येथील सचिन मोरे हा सैनिक शहीद झाला. त्याच्या कुटुंबातील पाल्यांच्या शिक्षणाची संपुर्ण जबाबदारी महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समितीतर्फे पूर्ण करण्यात येणार आहे. यानिमित्ताने शहीद जवानांच्या पाल्य, व कुटुंबीयांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे. 

यासंदर्भात आज या दोन्ही संस्थांचे प्रमुख हिरे कुटुंबीयांनी ही माहिती दिली. चीन सिमेवरील लडाखलगतच्या गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या मालेगांव तालुक्यातील साकुरी झाप येथील वीरजवान सचिन मोरे यांच्या मुलाचे पदवीपर्यंतच्या संपुर्ण शिक्षणाचे पालकत्व तसेच शैक्षणीक जबाबदारी महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती शिक्षण संस्थेने स्विकारली असून, दोन्ही संस्थेत उपलब्ध असलेल्यांपैकी कुठल्याही अभ्यासक्रमाची स्वेच्छेने निवड करण्याची मुभा त्यांना असेल, अशी माहिती संस्थेचे जनरल सेक्रेटरी, माजी राज्यमंत्री डॉ. प्रशांत हिरे, समन्वयक तथा माजी आमदार डॉ.अपूर्व हिरे आणि विश्वस्त, डॉ.अद्वय हिरे यांनी दिली.

ते म्हणाले, वीर जवान सचिन मोरे यांनी मातृभूमीच्या रक्षणास्तव सर्वोच्च बलिदान दिले. आपल्या साथीदारांचा जीव धोक्यात आलेला पाहून स्वतःच्या प्राणाची तमा न बाळगता साथीदारांना सही सलामत वाचविले. मात्र, या प्रयत्नात स्वतःच्या प्राणाचे मात्र बलिदान दिले. भारतमातेच्या या वीर सुपूत्राचा आम्हा सर्वांनाच अतिशय अभिमान वाटतो. सचिन मोरे यांच्या पश्चात आईवडिल, पत्नी व मुले असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या पाल्याच्या शिक्षणाबाबत कुठलीही चिंता, काळजी राहू नये, म्हणून महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती संस्थेने त्यांच्या मुलांच्या शिक्षणासंबंधीचे संपुर्ण पालकत्व स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संस्थेत उपलब्ध असलेल्यांपैकी ज्या अभ्यासक्रमात शिक्षण घ्यायचे असेल, त्याची निवड करण्याचे संपुर्ण स्वातंत्र्य व मुभा त्यांना असेल. 

संस्थेच्या या निर्णयाने जिल्ह्यातील शहीद कुटुंबीयांना आज दिलासादायक बातमी मिळाली आहे. या निर्णयासाठी विविध सामाजिक संस्था, शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या वतीने संस्थेचे कौतुक होत आहे.
...
नाशिक जिल्ह्यातील अन्य शहिद जवानांचे देखील पाल्य असतील, त्यांच्या पालकांनी मुलांच्या शिक्षणासाठी संस्थेकडे संपर्क साधावा, त्यांचेही शिक्षणासंबंधीचे संपूर्ण पालकत्व स्विकारण्यास दोन्ही संस्था तयार आहेत. 
- डॉ.अपूर्वभाऊ हिरे,  माजी आमदार,

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख