लग्न समारंभ करा, मात्र नियमांचेही पालन करूनच!  - Marrige will allow but with rules & Regulations, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

लग्न समारंभ करा, मात्र नियमांचेही पालन करूनच! 

संपत देवगिरे
बुधवार, 9 जून 2021

जानेवारी महिन्यात नियंत्रणात आलेल्या कोरोना संसर्गाने मार्च महिन्यात उच्चांकी पातळी गाठण्यामागे लग्न समारंभांना होणारी गर्दी कारणीभूत ठरली. या पार्श्‍वभूमीवर लग्न समारंभ, दुकाने सुरू करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जा असा इशारा महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिला. 

नाशिक जानेवारी महिन्यात नियंत्रणात आलेल्या कोरोना संसर्गाने मार्च महिन्यात उच्चांकी पातळी (Covid19 was highest in March) गाठण्यामागे लग्न समारंभांना होणारी गर्दी कारणीभूत ठरली. (Crowd was responsible for that)  या पार्श्‍वभूमीवर लग्न समारंभ, दुकाने सुरू करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जा असा इशारा महापालिका आयुक्त कैलास जाधव (Commissioner Kailas Jadhav) यांनी दिला. 

शासन निर्णयानुसार लग्नसमारंभ सोमवार ते शुक्रवार या कालावधीत जास्तीत- जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. समारंभ करण्यासाठी महापालिकेचे विभागीय अधिकारी, स्थानिक पोलिस स्टेशनकडून कार्यालय, लॉन्स धारकांना परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी कमीत-कमी तीन दिवस अगोदर वधू-वर पक्षाने संबंधित महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांना रीतसर माहिती कळविणे बंधनकारक आहे.

परवानगी आदेशाचे प्रथम उल्लंघन झाल्याचे पोलिसांकडून लॉन्स धारकांवर वीस हजार रुपये, वधू-वर पक्षावर प्रत्येकी दहा हजार, असे चाळीस हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास कोविड अधिसूचना रद्द होईपर्यंत सीलबंद कार्यवाही होईल.

अत्यावश्यक सेवेतील वैद्यकीय सेवा, मेडिकल दुकाने, दूध, वृत्तपत्रे विक्री, भाजीपाला व फळांचे दुकाने शासन निर्देशांचे पालन करून सायंकाळी ४ पर्यंत आठवडाभर सुरू राहतील. इतर दुकाने व आस्थापना सोमवार ते शुक्रवार या दरम्यान सांयकाळी चारपर्यंत सुरू राहतील. गर्दीचे विकेंद्रीकरण करून शारीरिक अंतराचे पालन करणे, मास्क परिधान करणे, सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य आहे. दुकानदारांकडून प्रथम उल्लंघन झाल्यास पाच हजार रुपये व ग्राहकाला एक हजार रुपये दंड, दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास कोविड अधिसूचना रद्द होईपर्यंत सील बंदची कार्यवाही होईल. 
...
हेही वाचा...

380 कोटींच्या `श्रीखंडा`सााठी नाशिकमध्ये भाजप- शिवसेनेची युती? 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख