मराठी पाऊल पडते पुढे...साक्रीचे तोरवणे दाम्पत्य बनले गुजरातचे कारभारी!

बेहेड (ता. साक्री) येथील भारतीय प्रशासन सेवेतील मिलिंद तोरवणे, भारतीय पोलिस सेवेतील त्यांची पत्नी निपुणा गुजरात सरकारच्या अर्थ व गृह मंत्रालयाच्या सचिवपदी विराजमान झाले आहेत. या निमित्ताने प्रशासन सेवेतही मराठी पाऊल पडते पुढे याची प्रचिती आली आहे.
मराठी पाऊल पडते पुढे...साक्रीचे तोरवणे दाम्पत्य बनले गुजरातचे कारभारी!

साक्री : येथील अनेक भूमीपुत्रांनी आतापर्यंत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करुन कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटविला आहे. यातून त्यांनी साक्रीचा लौकीक सातासमुद्रापार नेला आहे. त्यात आणखी एका गौरवाची भर पडली आहे. बेहेड (ता. साक्री) येथील भारतीय प्रशासन सेवेतील मिलिंद तोरवणे, भारतीय पोलिस सेवेतील त्यांची पत्नी निपुणा गुजरात सरकारच्या अर्थ व गृह मंत्रालयाच्या सचिवपदी विराजमान झाले आहेत. फक्त साक्रीच नव्हे तर मराठी माणसांसाठी हा बहुमान आहे.त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

यानिमित्ताने मराठी पाऊल पडते पुढे, याची प्रचिती आली आहे. भारतीय प्रशासन सेवेत या दाम्पत्याने आपल्या गुणवत्ता व प्रशासकीय कौशल्याचा ठसा उमटवला आहे. बेहेडचे निवृत्त कृषी अधिकारी शिवाजीराव तोरवणे यांचे पुत्र मिलिंद अभियांत्रिकीनंतर २००० मध्ये आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाले. ते प्रथम कच्छ येथे प्रांताधिकारी होते. पुढे राजपिपला येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तेथेच जिल्हाधिकारी, गोध्रा येथे जिल्हाधिकारी, सुरत महापालिका आयुक्तपदी त्यांनी कामकाज पाहिले. एक वर्ष प्रतिनियुक्तीवर त्यांनी अमेरिकेतही सेवा बजावली. ते तीन वर्षांपासून गुजरातच्या अर्थ विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. शासनाच्या योजना प्रभावी राबविल्याने व उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा गुजरातचे त्यावेळचे मुख्यमंत्री व विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन वेळा ‘उत्कृष्ट जिल्हाधिकारी’ पुरस्काराने गौरव झाला.

मिलिंद तोरवणे यांच्या पत्नी निपुणा यांनी कच्छ येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक, नर्मदा, पोरबंदर, दहारे, राजपिपला व वलसाड येथे पोलिस अधीक्षक, सुरत शहराच्या अतिरिक्त पोलिस आयुक्त तसेच अहमदाबादच्या साहाय्यक पोलिस आयुक्त, अशी पदे भूषविली आहेत. त्यांची नुकतीच गुजरातच्या गृह विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाली. त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘राष्ट्रपती पदक’, तसेच महिला आयोगाच्या ‘तेजस्विनी’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. विशेष गौरवाची बाब म्हणजे निपुणा तोरवणे गुजरातमधील भारतीय पोलिस प्रशासनातील पहिल्या महिला पोलिस अधिकारी ठरल्या आहेत. पुढील काळात साक्री तालुक्याच्या विकासासाठी, तरुणांसाठी योगदान देणार असल्याचे श्री. तोरवणे यांनी सांगितले.
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=Bl7iSKLQpdYAX-RLd00&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=8eacce3db1d59d50aac73d2b0fb500b4&oe=5FB37F27

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com