सोमवारी संभाजीराजे नाशिकला काय घोषणा करणार? - Maratha reservation Agitation in Nashik Tomorrow, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

सोमवारी संभाजीराजे नाशिकला काय घोषणा करणार?

संपत देवगिरे
रविवार, 20 जून 2021

मराठा समाज आरक्षण व इतर न्याय्य हक्कांसाठी झगडतो आहे. गेल्या पाच दशकांपासून अनेक आंदोलनांमधून समाजाने यासाठी लढा दिला. आजही समाज आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लढा सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती, खासदार संभाजीराजे हे जिल्हानिहाय मूक आंदोलन करीत आहेत.

नाशिक : मराठा समाज आरक्षण व इतर न्याय्य हक्कांसाठी झगडतो आहे. गेल्या पाच दशकांपासून अनेक आंदोलनांमधून समाजाने यासाठी लढा दिला. (Maratha Community fighting for Reservation Rights) आजही समाज आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लढा सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती, खासदार संभाजीराजे (M.P. Chhatrapati Sambhajiraje doing agitation for Issue) हे जिल्हानिहाय मूक आंदोलन करीत आहेत. नाशिकला उद्या (ता. 21) आंदोलन होत आहे. (Tomarrow Maratha agitation in Nashik) यासंदर्भात सर्व लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करावी. 

यासंदर्भात मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात सर्व लोकप्रतिनिधींना आवाहन केले आहे की, आत्तापर्यंत मराठा समाजाने आपली भूमिका मांडलेली आहे, आम्हीही मांडलेली आहे. यापुढे लोकप्रतिनिधींनी मांडावी म्हणून छत्रपती संभाजीराजे आपल्या जिल्ह्यात मुक आंदोलन करणार आहेत. आंदोलनात येऊन आपण आपली समाजबद्दलची भूमिका स्पष्ट करावी. 

यापूर्वी या लढ्यात समाजातील अनेक तरूणांनी बलिदान दिले आहे. अनेक तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अजूनही समाजाला न्याय मिळत नाही. इथून पुढेही मराठा समाजाला वेठीस धरणे योग्य ठरणार नाही. आता लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांच्या न्यायासाठी त्यांच्यासोबत या लढ्यात त्यांची भूमिका सभागृहांमध्ये मांडण्यासाठी, कोणती जबाबदारी स्वीकारणार व समाजाच्या न्यायिक मागण्या पूर्ण करण्यासाठी कशा पद्धतीने कार्यरत राहणार? हे स्पष्ट करावे. 

श्री. गायकर म्हणाले, उद्या (ता. २१) सकाळी दहाला गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृह शेजारील मैदानात हे आंदोलन होणार आहे. या नियोजित आंदोलनस्थळी उपस्थित राहावे. सकल मराठा समाजाच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री  दादा भुसे, विधानसभेचे उपसभापती आमदार नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, खासदार डॅा सुभाष भामरे, खासदार डॅा भारती पवार यांसह  सर्व आमदारांना निमंत्रित केले आहे.
...
हेही वाचा...

रक्षा खडसे म्हणाल्या, भाजप की राष्ट्रवाजी या कुंपणावर बसू नका!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख