मंत्र्याच्या घरात घुसून मराठे हक्काचे आरक्षण घेतील!

राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात आवश्यक ती कागदपत्रे दिली नाहीत. पुरावे दिले नाहीत. त्यांनी बोगासपणा केला, त्यामुळेच मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही. परंतु आता मात्र सरकारच्या मंत्राच्या घरात घुसून मराठे आपल्या हक्काचे आरक्षण घेतील, असे इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी दिला.
Nilesh Rane
Nilesh Rane

जळगाव : राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात आवश्यक ती कागदपत्रे दिली नाहीत. (Uddhav Thakre Government didn`t submit proper documents in SC) पुरावे दिले नाहीत. त्यांनी बोगासपणा केला, (They did bogus work) त्यामुळेच मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही. परंतु आता मात्र सरकारच्या मंत्राच्या घरात घुसून मराठे आपल्या हक्काचे आरक्षण घेतील, असे इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane deemands) यांनी दिला.

भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

या वेळी श्री. राणे म्हणाले, राज्यातील ठाकरे सरकारला मराठा समाजाला मुळात आरक्षण देण्याची इच्छा नाही. त्यामुळेच जाणून बुजून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात पुरावे सादर केले नाहीत. सरकारने सर्वोच्च न्यायालयात मुद्दाम अनेक चुका केल्या. या सरकारने अद्यापही मागासवर्ग आयोग स्थापन केलेला नाही.  मुख्यमंत्री ठाकरे यांना मराठा आरक्षणाची कोणतीही माहिती नाही. त्यांनी हातात कागद न घेता, जर मराठा आरक्षणाची माहिती सांगितली तर आपण कोणतीही पैज  हरण्यास तयार आहोत. माजी मुख्यमंत्री मंत्री अशोक चव्हाण समितीचे अध्यक्ष असल्याने आरक्षण मिळणार नाही, याचीही आम्हाला खात्री होती. 

राज्यातील मराठा समाज आता संतापला आहे. तो आता गप्प बसणार नाही. हा समाज केंव्हा तीव्र आंदोलन करतो आहे, याची वाट हे ठाकरे सरकार पाहत आहे. परतू आता ती वेळ आली आहे. आता मराठा समाज ठाकरे सरकारच्या मंत्राच्या घरात घुसून आपल्या हक्काचे आरक्षण घेतील. भाजपतर्फे मराठा आरक्षणासाठी राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com