छत्रपती संभाजी म्हणाले, "गोळी वा तलवार, पहिला वार माझ्यावर होऊ दे'

खासदार, छत्रपती संभाजी राजे धिकच आक्रमक झाले होते. ते म्हणाले, ही आपली शेवटची लढाई आहे. यात गोळी असो वा तलवार, पहिला वार माझ्यावर होऊ दे. मात्र या लढाईत मॅनेज झालो तर छत्रपती घराण्याचे नाव लावणार नाही.'
छत्रपती संभाजी म्हणाले, "गोळी वा तलवार, पहिला वार माझ्यावर होऊ दे'

नाशिक : मराठा क्रांती मोर्चाच्या राज्याच्या विविध भागातील समन्वयकांची बैठक आज येथे झाली. यावेळी मराठा आरक्षणासाठी संघर्ष तीव्र करण्याचा निर्णय झाला. यावेळी खासदार, छत्रपती संभाजी राजे धिकच आक्रमक झाले होते. ते म्हणाले, ही आपली शेवटची लढाई आहे. यात गोळी असो वा तलवार, पहिला वार माझ्यावर होऊ दे. मात्र या लढाईत मॅनेज झालो तर छत्रपती घराण्याचे नाव लावणार नाही.' 

आज सकाळपासून सुरु झालेल्या या बैठकीत साठहून अधिक पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. त्यामुळे सायंकाळी चारपर्यंत ही बैठक सुरु होती. त्याचे सुत्रसंचालन व समारोप खासदार, छत्रपती संभाजी महाराज यांनी केला. या बैठकीत सातत्याने खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजी राजे यांच्या नावाच्या घोषणा होत होत्या. यावेळी बुहतांश पदाधिकाऱ्यांनी केंद्रातील व राज्यातील दोन्ही सरकारांची भूमिका मराठा समाजाला आरक्षण देतांना पारदर्शी दिसत नाही. त्यांची ही भूमिका बदलली नाही, तर यापुढे अत्यंत आक्रमक आंदोलन करावे. मात्र समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसु नये. नाशिकला झालेल्या बैठकीत मराठा क्रांती मोर्चा चे नेतृत्व आणि आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व संभाजी महाराज यांनी करावं असा ठराव करण्यात आला. बैठकी नंतर खासदार संभाजी राजे यांनी पत्रकारांनी माहिती दिली. 

यावेळी बैठकीत छत्रपती संभाजी महाराज म्हणाले, मराठा आरक्षणाचा विषय जेव्हा ज्वलंत बनला आहे, तेव्हा संसदेचे अधिवेशन सुरु आहे. यावेळी राज्यसभेत मराठा समाजाचे नेते उस्फूर्तपणे बोलत नव्हते. मी स्वतः मराठा समाजासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय. मात्र या ांदोलनात कधीही मॅनेज झालेलो नाही. मॅनेज झालो तर छत्रपतींचा वंशज म्हणून घेण्याची पात्रता नाही. या लढाईत अंगावर पहिला वार माझ्यावर होऊ दे. गोळीचा होऊ दे, की तलवारीचा होऊ दे. मी समाजाचा सेवक म्हणून मी पुढे येईन. छत्रपती संभाजी महाराज म्हणून नाही, तर मराठा समाजाचा सेवक म्हणून मी इथे आलो आहे. कुटुंब प्रमुख म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. मात्र मी नम्रपणे नेतृत्व करण्याचं टाळतो. पण शेवटपर्यंत ही लढाई लढणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून मी सदैव तुमच्या सोबत राहणार. 

"सारथी'ला हजार कोटी द्या ना... 
ते म्हणाले, सारथी संस्थेवरूनच हमरी तुमरी झाली. सारथी ला द्या ना हजार कोटी. आरक्षणा बरोबर सारथीला सुद्धा न्याय देण्याची गरज आहे. सारथीच्या अध्यक्ष पदाबद्दल मी विचार करू शकतो. मी जुन्या सरकारला देखील ठोकतो. देवेंद्र फडणवीसांना पण माफी मागायला लावली. सगळ्यांनी एका छता खाली यायला पाहिजे.

 सातारा आणि कोल्हापूर घराणे एकच
राज्यात 58 मोर्चांमध्ये सगळे एकत्र आले होते. मग आता का वेगळे? असा प्रश्‍न त्यांनी केला. छत्रपती संभाजी महाराज म्हणाले, ही आपली शेवटची लढाई आहे. या लढाईत उदयनराजे आणि आम्ही एकच आहोत. सातारा आणि कोल्हापूर घराणे एकच. काही नेते इकडे जातात काही तिकडे जातात. कोणी अशी फालतू गिरी करत असेल तर अशाना ठोका. 
...  

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=IJjfSVQdRK0AX9iJte7&_nc_ht=scontent-sin6-2.xx&oh=b3a3638765e5e2c1bcf8e866e8e8a02d&oe=5F93DB27

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com