मराठा समाजाचा सरसकट `ओबीसी` संवर्गात समावेश करावा

मराठा समाजाचा सरसकट `ओबीसी` संवर्गात समावेश करावा अशी मागणी नाशिक जिल्हा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडतर्फे करण्यात आली.
मराठा समाजाचा सरसकट `ओबीसी` संवर्गात समावेश करावा

नाशिक : मराठा समाजाचा सरसकट `ओबीसी` संवर्गात समावेश करावा अशी मागणी नाशिक जिल्हा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडतर्फे करण्यात आली. 

यासंदर्भात माधुरी भदाणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी  श्रीमती भदाणे म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग स्थापन कायदा २००६ आणि न्यायमुर्ती एम. जी. गायकवाड राज्य मागासवर्ग आयोग अहवाल २०१८ अशा दोन आयोगानुसार महाराष्ट्र शासनाने राज्यात मागासवर्ग आयोग स्थापन केला आहे. त्यानुसार आयोगाच्या कक्षा राज्यातील `ओबीसी` जाती ठरविणे हा हेतू होता. त्यानुसार नवीन जातींचा त्यात समावेष करणे, जून्या समाविष्ट जातींचा आढावा आदींबाबत  राज्य शासनास सुचना करणे एव्हढीच आयोगाची जबाबदारी होती. 

मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गठीत केलेल्या न्यायमूर्ती एम जी गायकवाड मागासवर्ग आयोगाचे गठन केले आहे. या आयोगाने सर्व तपासणी करून आपला अहवाल शासनास सादर केला आहे. त्यानुसार मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात मागासलेला असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार तो मराठा समाज राज्य घटना कलम ३४० मधील आरक्षणास पात्र ठरला आहे. गायकवाड अहवालातील शिफारशी मान्य करून मराठा समाजाचा सरसकट समावेश राज्यातील अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षण यादीत करावा अशी मागणी केली. 

यावेळी संघटनेचे संघटक जयंत देशमुख यांनी महाराष्ट्र शासनाने राज्यात ओबीसी आरक्षणाला अ ब क ड प्रमाणे विभागलेले आहे. कृपया मराठा समाजाचीही अशीच एखादी ओबीसी अंतर्गत उपविभागणी करून ३-४ टक्के वेगळेच आरक्षण लागू करण्यात येऊ शकते.  मराठा सेवा संघ १९९१ पासून हीच विनंती व मागणी करीत आहे. यापूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला ओबीसी दर्जा नाकारला होता. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण लागू झाले नाही. गायकवाड आयोगाने सरळ व स्पष्टपणे मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र असल्याचा अहवाल सादर केला असतांनाही मराठा समाजाला ते आरक्षण लागू केले जात नाही. हा मराठा समाजावर मोठा अन्याय होत असल्याचे सांगितले.

मराठा समाजाला ओबीसी आरक्षण लागू झाले तर मराठा युवकांना अखिल भारतीय पातळीवरील सर्व लाभ मिळणार  मराठा समाजाला ओबीसी आरक्षण लागू करावे यावेळी विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे यांनी शासनाने सारथी संस्थेस तूटपूंजी मदत जाहिर केल्याचे सांगत तारादूतांनी कौशल्य विकास प्रशिक्षण घेतले होते.तारादूतांच्या माध्यमातून समाजापर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविल्या जात होत्या तात्काळ तारादूतांना तात्काळ पुनर्नियुक्ती देण्यात यावीतारादूत प्रकल्पावरील स्थगिती तात्काळ उठवावी अशी मागणी केली .

यावेळी संभाजी ब्रिगेडचे महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नींबाळते, भरत पाटील,  के. डी. पाटील, दीपक भदाणे, पांडुरंग शिंदे, अनुराधा धोंडगे, चारुशिला देशमुख, निलिमा निकम, कल्पना नींबाळते, रश्मी धोंडगे, आदित्य मगर, निनाद नींबाळते, आकाश ठाकरे, निशांत खांदवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
...
मराठा सेवा संघाचे संस्थापक, अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांची मराठा समाजाचा समावेश सरसकट ओबीसी प्रवर्गात करावी अशी  मागणी गेल्या ३० वर्षापासून सुरु आहे. शासनाची उदासीनता याला कारणीभूत आहे. शासन दखल घेत नसेल तर याची मोठी किंमत आगामी काळात मोजावी लागेल.- माधुरी भदाणे, प्रदेशाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड.
...
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=IJjfSVQdRK0AX9iJte7&_nc_ht=scontent-sin6-2.xx&oh=b3a3638765e5e2c1bcf8e866e8e8a02d&oe=5F93DB27

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com