मराठा चेंबरकडून नाशिकच्या कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात - Maratha chamber of commerce help for oxigen concentrate, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

मराठा चेंबरकडून नाशिकच्या कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 मे 2021

पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि वैद्यकीय व्यवस्थेचा विस्तार करण्यासाठी योगदान दिलेल्या पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोव्हिड रिस्पॉन्स (पीपीसीआर) या स्वयंसेवी समूहाने राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

नाशिक : पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि वैद्यकीय व्यवस्थेचा विस्तार करण्यासाठी योगदान दिलेल्या पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोव्हिड रिस्पॉन्स (पीपीसीआर) या स्वयंसेवी समूहाने राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार या समूहातर्फे नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयास २५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व पाच ‘बीआयपीएपी’ यंत्रे देण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

पीपीसीआर हा मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅन्ड ॲग्रिकल्चर (एमसीसीआयए) प्रणीत स्वयंसेवी समूह आहे. या समूहात उद्योग, वैद्यकीय, संशोधन अशा विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींचा समावेश आहे. समूहाने गेल्या वर्षभरात पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यात वैद्यकीय व्यवस्था विस्तारण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केले आहे. तसेच सध्याचा प्राणवायूचा तुटवडा दूर करण्यासाठी या समूहाने सिंगापूरहून कृत्रिम श्वसन यंत्रणा, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आयात केले आहेत. पुणे जिल्ह्यात वैद्यकीय उपकरणे देतानाच राज्यातील अन्य आठ जिल्ह्यांनाही आवश्यकतेनुसार मदत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबने म्हणाले, की कोरोनाचा फटका बसलेल्या नगर, नागपूर, ठाणे, चंद्रपूर, भंडारा, लातूर, पालघर आणि नाशिक या आठ जिल्ह्यांतील वैद्यकीय व्यवस्थेसाठी मदत म्हणून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व बीआयपीएपी यंत्रे देण्यात येत आहेत. त्याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. त्याशिवाय या जिल्ह्यांतील नागरिकांनी मिळून पीपीसीआरच्या माध्यमातून निधी संकलन सुरू केले आहे. या संकलित होणाऱ्या निधीतूनही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख