भाजपच्या अनेकांना कॅाग्रेस, राष्ट्रवादी कॅाग्रेसमध्ये प्रवेश करायचा आहे !

भारतीय जनता पक्षातील अनेक नेत्यांना कॅाग्रेस आणि राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षात परत यायचे आहे. तसे स्पष्ट संकेत व माहिती आमच्याकडे आहे. यासंदर्भात काय निर्णय घ्यायचा, हे लवकरच पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय करतील.
भाजपच्या अनेकांना कॅाग्रेस, राष्ट्रवादी कॅाग्रेसमध्ये प्रवेश करायचा आहे !

नाशिक : भारतीय जनता पक्षातील अनेक नेत्यांना कॅाग्रेस आणि राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षात परत यायचे आहे. तसे स्पष्ट संकेत व माहिती आमच्याकडे आहे. यासंदर्भात काय निर्णय घ्यायचा, हे लवकरच पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय करतील, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. 

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, सामान्यतः विविध कारणांनी सत्ताधारी पक्षात जावे असे नेते, पदाधिकारी यांची इच्छा असते. भारतीय जनता पक्षात गेलेल्या अनेक नेत्यांनी यापूर्वी तसे केल्याचे आपल्यापुढे उदाहरण आहे. आज ही स्थिती पुर्णतः बदलली आहे. आज शिवसेना, कॅाग्रेस आणि राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांना पुन्हा परत जावे असे वाटू लागले आहे. 

भारतीय जनता पक्ष सातत्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकाविषयी सरकार केव्हा कोसळणार याविषयी नवे नवे मुहुर्त सांगत असतो. या सरकारमध्ये आमदार नाराज आहेत. त्यांना भाजपला पाठींबा द्यायचा आहे, अशी विधाने भाजपचे नेते करीत असतात. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॅाग्रेसचे मंत्री नवाब मलीक यांनी नुकतेच भाजपचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे सांगितले. याविषयी श्री. भुजबळ यांना विचारणा केल्यावर त्यांनी ही माहिती दिली. 

ते म्हणाले, भारतीय जनता पक्षात गेलेल्या बहुतांश नेत्यांचा मुळ पक्ष कॅाग्रेस पक्ष आहे. या पक्षातूनच ते भाजपमध्ये गेले आहेत. त्यांचे अजोबा, पणजोबा देखील कॅाग्रेस पक्षात होते. ज्यांची सबंध हयात कॅाग्रेस पक्षात गेली आहे, त्यांना एकदम विचारधारेच्या पक्षात कसे करमेल. त्यांनी पुन्हा स्वगृही परवाते असे यातील अनेकांना वाटत आहे. कोणाला कॅाग्रेस पक्षात तर अनेकांना राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षात परतायचे आहे. आता याबाबत काय व कोणता निर्णय घ्यावा हे मी सांगू शकत नाही. पक्षातील वरिष्ठ नेते योग्य ते धोरण ठरवतील. त्यानंतर या नेत्यांच्या प्रवेशाचा निर्णय स्पष्ट होईल. 
...    

https://scontent.fpnq1-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=_qv_SXSxylAAX9w5uq8&_nc_ht=scontent.fpnq1-1.fna&oh=5fe6d4b7ea2de83d0080ea23ed0c0b03&oe=5F5C7C27

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com