`कोरोना`च्या खर्चाने मालेगाव महापालिकेवर आर्थिक संकट !

शहरात कोरोनाचा ससंर्ग वाढल्यावर सर्व यंत्रणा, साधने व बहुतांश निधी कोरोनाविरोधात उपाययोजनांत खर्ची पडत आहे. या काळात तीन कोटींहून अधिक खर्च झाला. शासनाकडून फक्त वीस लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे.
`कोरोना`च्या खर्चाने मालेगाव महापालिकेवर आर्थिक संकट !

मालेगाव : शहरात कोरोनाचा ससंर्ग वाढल्यावर सर्व यंत्रणा, साधने व बहुतांश निधी कोरोनाविरोधात उपाययोजनांत खर्ची पडत आहे. या काळात तीन कोटींहून अधिक खर्च झाला. शासनाकडून फक्त वीस लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे, असे असले तरीही कोरोनाच्या रुग्णांसाठी काहीही कमतरता पडू दिली जाणार नाही, असे माजी आमदार, माजी महापौर रशीद शेख यांनी सांगितले. 

ते म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व बाधितांवर उपचारासाठी महापालिका लोकप्रतिनिधी व प्रशासन कटिबध्द आहे. महापालिका आर्थिक संकटात असली, तरीही रूग्णांच्या उपचारासाठी औषधे व साधनांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेत आहोत. कोरोना संसर्गामुळे घटलेले महापालिकेचा महसूल वाढविण्यासाठी मालमत्तांचे सर्वेक्षण, बीओटी तत्वावर व्यापारी संकुलांची निर्मिती, आदी उपाययोजना केली जात आहे.

श्री. शेख यांनी सांगितले, की कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आली आहे. तरी शहर कोरोनामुक्त झालेले नाही. नागरिकांनी मास्क लावावे. सुरक्षित अंतर राखावे. गर्दीत जाणे व अनावश्‍यक कामांसाठी घरातून बाहेर फिरणे टाळावे. आरोग्य यंत्रणेच्या सुचनांकडे दुर्लक्ष करु नये. तसे झाल्यानेच पुन्हा कोरोना संसर्ग फैलावत आहे. शहरात आजही 337 बाधीत उपचार घेत आहेत. औषधे, गोळ्या, इंजेक्शन. सॅनिटायझर यासह कुठल्याही साहित्य साधनांची कमतरता भासणार नाही याची काळजी मनपा प्रशासन व आरोग्य यंत्रणा घेत आहे. नागरिकांनी सूचनांचे पालन करावे.  

ते पुढे म्हणाले, कोरोना संसर्गामुळे करवसुली घटल्याने महापालिकेवर आर्थिक संकट आहे. उत्पन्नवाढीसाठी जनतेवर बोजा न टाकता इतर पर्याय शोधले जात आहेत. नव्याने बांधलेल्या अनेक मालमत्तांना कर आकारणी नाही. अशा मालमत्तांचे तातडीने सर्व्हेक्षण करुन कर वसुली होईल. बीओटी तत्वावर व्यापारी संकुलांमुळे उत्पन्न वाढीस हातभार लागेल. प्राप्त परिस्थितीत  नगरसेवकांना चार लाख निधी वगळता अतिरिक्त निधी देणे अवघड आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांनी सहकार्य करावे. यावेळी साबीर गोहर, रिजवान अहमद हे उपस्थित होते. 

पोलिस अधिक्षकांनी श्रेय घेऊ नये!
हा उद्रेक नियंत्रणासाठी महापौर ताहेरा शेख, आयुक्त ञ्यंबक कासार, उपायुक्त नितीन कापडणीस, आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, डॉक्टर्स, परिचारिका, सामाजिक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. पोलिसांचा मार खावून देखील मनपा सेवकांनी काम थांबवले नाही. खासगी डॉक्टरांनी चांगले योगदान दिले. मात्र जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख व आरोग्य उपसंचालक कोरोना नियंत्रणात आणल्याचे श्रेय घेतात. त्याचा खेद वाटतो. स्थानिक अधिकारी व सेवकांचे श्रम हे नाकारता येणारे नाही. 
....
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=_qv_SXSxylAAX8XskD5&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=556a6a7fbf378b8838d39531d2454104&oe=5F5887A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com