महायुतीच्या दुसऱ्या दूध आंदोलनाचा मुहुर्त मंगळवारी ठरणार !  - Mahayuti leaders will plan second Milk Agitation in Maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

महायुतीच्या दुसऱ्या दूध आंदोलनाचा मुहुर्त मंगळवारी ठरणार ! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत त्याबाबत समाधानी नसल्याने नव्याने आंदोलनाच्या विचारात आहेत. नव्या आंदोलनाचा मुहुर्त कोणता? हे मंगळवारी (ता. 11) व्हर्च्युअल बैठकीत ठरणार आहे.

नाशिक : महायुतीच्या दूध आंदोलनाने हाती काहीच पडले नसल्याची भावना महायुतीच्या नेत्यांत निर्माण झाली आहे. विशेषतः माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत त्याबाबत समाधानी नसल्याने नव्याने आंदोलनाच्या विचारात आहेत. नव्या आंदोलनाचा मुहुर्त कोणता? हे उद्या (ता. 11) व्हर्च्युअल बैठकीत ठरणार आहे. 

महायुतीच्या घटक पक्षांनी याआधी राज्यभर दूध आंदोलन केले होते. यावेळी विविध भागात तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी रस्त्यावर दूध ओतण्यापासून तर रास्ता रोकोही करण्यात आला. मात्र त्यानंतर सरकारकडून त्याबाबत काहीही हालचाली झालेल्या नाहीत. मागण्यांविषयी काहीच निर्णय राज्यातील सरकार घेत नाही, असे श्री. खोत म्हणाले.

यासंदर्भात ते चांगलेच संतापले होते. ते म्हणाले, शासनाच्या या भूमिकेमुळे सगळीकडे नाराजी आहे. राज्यातील सरकारला दूध उत्पादकांविषयी काहीही आपुलकी, प्रेम वाटत नाही. काहीच काळजी नसल्यामुळे सरकार दूध उत्पादकांना वेड्यात काढत आहे. सरकारने आम्ही केलेल्या आंदोलनाला चेष्टेचा विषय ठरवला. कारण त्यांनी या ज्वलंत विषयावर काहीही निर्णयच घेतलेला नाही. आंदोलकांनी केलेली कोणतिही मागणी मान्य केलेली नाही. आंदोलनकर्त्यांना चर्चेला देखील बोलावलेले नाही. राज्यातील दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी गरोदर मातांना ल कुपोषित बालकांना पाच हजार टन दूध पावडर देण्याची घोषणा केली. या निर्णयाने दूध उत्पादकांना न्याय मिळालेला नाही. त्यांचे समाधान देखील होणार नाही. दूधाला दहा रुपये आणि दुधाच्या पावडरला पन्नास रुपये प्रती किलो अनुदान देने हाच त्यावर खरा पर्याय आहे. ती मागणी आम्ही केली आहे. त्यावर सरकारने काहीही निर्णय घेतलेला नाही. 

आंदोलनानंतर दूधाला भाव वाढवून मिळालेला नाही. उलट वीस रुपयांचा दर अठरा रुपये केला. त्याच दराने दूध खरेदी केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आता दूध आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल. राज्यात 55 हजार टन दूधाची पावडरचा शिल्लक साठा आहे. सध्या सरकारने जो निर्णय घेतला आहे, त्याची गती पाहता तो संपण्यासाठी पुढचे अकरा वर्षे लागतील. सरकारने जमिनीवरची वास्व स्थितीचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. 

श्री. खोत म्हणाले, उद्या (ता.11) सकाळी भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेते, आमदार, खासदारांची व्हर्च्युअल बैठक होईल. त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी चर्चा होईल. येत्या 13 ऑगष्टपासून या आंदोलनाची व्यापकता वाढविण्यात येईल. उद्या त्याचा पुढील कार्यक्रम जाहिर करण्यात येईल. 
...
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख