भाजपला रोखण्यासाठी नाशिकलाही महाविकास आघाडी? - Mahavikas Front will form in Nashik Also? | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपला रोखण्यासाठी नाशिकलाही महाविकास आघाडी?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीतही महाविकास आघाडी होणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर हाच फॉर्म्युला नाशिक महापालिकेच्या निवडणुकीतही अमलात येणार आहे.

नाशिक : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीतही महाविकास आघाडी होणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर हाच फॉर्म्युला नाशिक महापालिकेच्या निवडणुकीतही अमलात येणार आहे. त्यासाठीचा मास्टर प्लॅन महाविकास आघाडीच्या समन्वयकांकडून आखला जात आहे. मुंबई महापालिकेबरोबरच नाशिक महापालिकेचीही निवडणूक होत असल्याने हा फॉर्म्युला अमलात आणला जाईल. 

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अमलात आणताना भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवले. महाविकास आघाडीचे सरकार टिकेल की पडेल, यावरून चर्चा घडत असतानाच शिवसेनेच्या ऑनलाइन दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीचे समन्वयक खासदार संजय राऊत यांनी सरकार भक्कम असून, कोणी पाडण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला. त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महाविकास आघाडीच्या घोषणेमुळे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. मुंबई महापालिकेबरोबरच नाशिकच्याही निवडणुका होत असल्याने येथेही महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अस्तित्वात येण्याचे संकेत मिळत आहेत. 

दुसऱ्या क्रमांकाच्या जागांचे वाटप 
शहरी भागात शिवसेनेचे, तर ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. शहराच्या मुस्लिम व दलित वस्तीच्या भागांमध्ये काँग्रेसचे ठराविक पॉकेट्स आहेत. सध्या ज्या जागांवर नगरसेवक निवडून आले, त्या जागा वगळता अन्य जागांवर वाटप होण्याची शक्यता आहे. २०१७ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. परंतु त्या जागेवर भाजपचे नगरसेवक निवडून आले. त्या जागांचे वाटप महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यामध्ये केले जाणार आहे. त्याचबरोबर पुढील वर्षातील दिवाळीच्या दरम्यान भाजपमध्ये चांगले काम केलेल्या नगरसेवकांना महाविकास आघाडीत निमंत्रित करण्याचाही एक भाग रणनीतीचा असेल.  
....
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख