महंत सागरानंद म्हणतात, `पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करीत आहेत`

पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करीत आहेत. त्यांना समाजाचा पाठींबा आहे. त्यामुळे भारतीवर ोकणतेही संकट आले, तरी त्याचा मुकाबला करण्यास देश सक्षम आहे, असे अखलि भारतीय षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष, महंत सागरानंद यांनी सांगीतले.
महंत सागरानंद म्हणतात, `पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करीत आहेत`

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करीत आहेत. त्यांना समाजाचा पाठींबा आहे. त्यामुळे भारतावर कोणतेही संकट आले, तरी त्याचा मुकाबला करण्यास देश सक्षम आहे, असे अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष, महंत सागरानंद यांनी सांगीतले.

महंत सागरानंद यांनी आज त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्ताचे दर्शन घेतले. भारत आणि चीन दरम्यान गालवान खोरे सध्या सैनीकांच्या आगळीकीमुळे अशांत आहे. त्यावरुन मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी ही ही प्रतिक्रीया व्यक्त केली.

ते म्हणाले, चीनने भारताविरोधात आगळीक केल्यास त्याचा फटका चीनलाच बसेल. कारण भरात त्याला सक्षम उत्तर देईल. मात्र चीनने जगाला महामारी दिली आहे. त्यामुळे अन्य देशही त्याच्या विरोधात मदतीला येतील. चीन विरोधात जगात अनेकांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. चीनने भारतीय सीमेवर आगळीक केली आहे. त्यात भारतीय सैनीकांनी चोख उत्तर दिले. त्यामध्ये काही भारतीय जवान हुतात्मा झाले. यापुढेही भरातीय लष्कर चीनी सौनिकांना उत्तर देण्यास सक्षम आहे. कोरोना महामारीने सगळे जग त्रस्त आहे. ही महामारी जागाला चीननेच दिली. आता तो भारताचा भूभाग बळकावण्याचा डाव आखतो आहे. हा प्रयत्न त्याला त्रासदायक ठरेल. 

ते म्हणाले, चीन व भारत भाई भाई म्हणत, त्यांनी भारतीयांचे गळे कापले. त्याला धडा शिकवण्यास भारत समर्थ आहे. मात्र कोरोना महामारी चीनने जगाला दिली आहे. त्यामुळे जगभर चीन विरोधात नाराजी आहे. त्यामुळे भारताच्या बाजुने अन्य काही देश उभे राहतील. 
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=2c4LnSiSfOQAX-ifPUN&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=aa2aacfe71d76a024b0a5d4f712c84be&oe=5F1D3427

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com