नाशिकमध्ये उद्यापासून कडक लॅाकडाउन होणार?

कोरोनाच्या प्रसारात नाशिकने मुंबई, नागपूर आणि पुणे शहरालाही मागे टाकले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत नाशिक हे राज्यातील अव्वल शहर ठरले आहे. रुग्णसंख्या वाढीचा वेग खाली येण्याची कोणतिही लक्षणे सध्या नाहीत.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

नाशिक : कोरोनाच्या प्रसारात नाशिकने मुंबई, नागपूर आणि पुणे शहरालाही मागे टाकले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत नाशिक हे राज्यातील अव्वल शहर ठरले आहे. रुग्णसंख्या वाढीचा वेग खाली येण्याची कोणतिही लक्षणे सध्या नाहीत. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शहरात अधिक कडक व संपुर्ण लॅाकडाउन होण्याची चिन्हे आहे. 

कोरोना रुग्णांच्या संख्येच्या ताज्या अहवालात राज्यातील चार शहरे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. दहा लाख लोकसंख्येच्या तुलनेतच आता नाशिक हे पहिल्या स्थानावर तर नागपूर दुसरे, पुणे तिसरे व मुंबई चौथ्या स्थानावर आहे. देशातील कोरोना प्रसार झालेल्या दहा आघाडीच्या शहरांत ही चार शहरे आहेत. 

नाशिकमध्ये शहरात गेल्या महिन्यात सरासरी ३,९४७ रुग्णसंख्या होती. दहा लाख लोकांमागे हे प्रमाण १,८५९ होते. सध्याचा हा वेग अधिक असुन  गेल्या महिन्यात ९७,७६५ रुग्ण दाखल झाले आहेत. प्रती दशलक्ष नवे रुग्ण ४६,०५० असल्याने ते देशातील सर्वाधिक प्रमाण आहे. नागपूरमध्ये दशलक्ष लोकसंख्येमागे नव्या रुग्णांची संख्या ४५,८५६, पुणे शहर ३६,३५९ तर मुंबईत १७,९४६ आहे. सध्या कोरोना प्रसाराचा वेग अधिक आहे. सध्याचे जे लॅाकडाउन आहे त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. नागरिकांचा सर्व ठिकाणी वावर कायम आहे. यामध्ये पोलिसांकडून कोणतिही सक्ती किंवा प्रतिबंध होताना दिसत नाही. त्यातून ही स्थिती नियंत्रणात येण्याऐवजी हाताबाहेर जाण्याचा धोका आहे. त्याबाबत आरोग्य यंत्रणा तसेच केंद्रीय पथकाकडूनही प्रशासनाला यापूर्वीच सूचना करण्यात आलेल्या आहेत. शहरात शासकीय, स्वयंसेवी संस्था तसेच खाजगी रुग्णालयांत देखील रुग्णांसाठी जागा नाही. उपचाराच्या सुविधा कमी पडत आहेत. त्यामुळे शहरात अक्षरशः आणिबाणीची स्थिती आहे. 

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज विविध यंत्रणांशी चर्चा केली. आज सायंकाळी यासंदर्भात कोरोनाची आढावा बैठक होणार आहे. त्यात कडक लॅाकडाउन जाहीर होण्याची शक्यता आहे. 
...   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com