राजकारण विसरुन स्थानिक सरपंचांनीच केले `कडवा`चे जलपूजन - Local sarpanch came together for Kadwa dam jalpujan | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आज एकाच व्यासपीठावर

राजकारण विसरुन स्थानिक सरपंचांनीच केले `कडवा`चे जलपूजन

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

या आठवड्यात कडवा धरण भरले. त्यामुळे परिसरातील पंचक्रोशीतील ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण आहे. या आनंदाच्या भरातच परिसरातील ग्रामस्थ व सरपंचांनी एकत्र येत कडवा धरणाचे जलपूजन केले.

नाशिक  : यंदा पावसाचा तालुका असलेल्या इगतपूरी तालुक्‍यात सुरवातीपासून पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे चिंतेचे वातावरण होते. या पार्श्‍वभूमीवर या आठवड्यात कडवा धरण भरले. त्यामुळे परिसरातील पंचक्रोशीतील ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण आहे. या आनंदाच्या भरातच परिसरातील ग्रामस्थ व सरपंचांनी एकत्र येत कडवा धरणाचे जलपूजन केले. यावेळी विविध सरपंच एकत्र आल्याने या जलपूजनाच्या कार्यक्रमाला विशेष महत्व दिले जात आहे. 

स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या पाटबंधारे प्रकल्पांनी अपेक्षीत संचय क्षमता पूर्ण केल्यावर लोकप्रतिनिधी, नेत्यांच्या उपस्थितीत जलपूजन करण्याचा प्रघात आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणा भरण्यासा सुरवात झाल्याने कडवा धरणाच्या वरच्या बाजूच्या भावली धरणाचे जलपूजन यापूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झाले होते. हे धरण मात्र खालच्या भागात असल्याने अजुन त्यात अपेक्षीत जलसाठा झाला नव्हता.  

आज सकाळी 1688 दशलक्ष घनफूट क्षमतेचे कडवा धरण शंभर टक्के भरले. इगतपूरी तालुक्‍यातील दारणा समुहातील हे मोठे धरण आहे. गतवर्षी या कालावधीत धरणाचा साठा 99 टक्के साठा होता. या तालुक्‍यात सरासरी 994.37 मीलीमीटर पाऊस होतो. आजपर्यंत तालुक्‍यात या महिन्यात एक हजार 159 मिलीमिटर असा ऑगष्ट महिन्याच्या तुलनेत सरासरी 117 टक्के पाऊस झाला. जून ते सप्टेबर या कालावधीत या तालुक्‍यातील पावसाची सरासरी तीन हजार 557 मि. मि. आहे. गतवर्षी येथे चार हजार 221 मि.मि. पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा 1 जून ते 10 ऑगष्ट या कालावधीत 2676 मि.मि. पाऊस झाला आहे. मात्र त्यात सातत्य नव्हते. विलंबाच्या पावसाने धरण भरण्यास देखील विलंब झाला. आज धरण भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांची पाण्याची चिंता दूर झाली. त्यामुळे पक्ष, संघटना बाजूला ठेवत येथील शेतकरी व सरपंचांनी एकत्र येत आज जलपूजन केले. यानिमित्ताने परिसरातील सर्व सरपंचांत एकोपा निर्माण झाल्याने ग्रामस्थांनि याबाबत समाधान व्यक्त केले. 
... 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख