यासाठी उद्योगांनी नाशिकमध्ये कोरोना केअर सेंटर उभारावेत !

जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांनाकोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील मोठ्या उद्योगांनी डेडिकेटेड कोरोना हॉस्पिटल उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा.
यासाठी उद्योगांनी नाशिकमध्ये कोरोना केअर सेंटर उभारावेत !

नाशिक : जिल्ह्यातील सातपूर, अंबड, दिंडोरी, इगतपुरी, सिन्नर  या औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांना कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात गावागावांमध्ये कोरोनाचा प्रसार होत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील मोठ्या उद्योगांनी डेडिकेटेड कोरोना हॉस्पिटल उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे पत्र सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी. एल. कराड यांनी संबंधीतांना लिहिले आहे.  

कामगारांतील कोरोनामुळे त्यांचे विलगीकरण करणे, उपचार उपलब्ध करणे यात अडचणी येतात. अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही.खाजगी हॉस्पिटलकडून अवाजवी बिले आकारून पिळवणूक केली जाते. त्यामुळे पालकमंत्र्यांनी उद्योगांशी चर्चा करावी, असे पत्रात म्हटले आहे. या उद्योगांनी असे कोरोना सेंटर आणि हॉस्पिटल उभारावे, या पत्रावर जिल्हाध्यक्ष सिताराम ठोंबरे, सरचिटणीस देविदास आडोळे यांच्याही सह्या आहेत. 

ते म्हणाले, उद्योग सुरू करताना शासनाच्या अटी शर्तीचे पालन काटेकोरपणे केले जात नसल्यामुळे कोरोणाचा प्रसार होत आहे. यासंदर्भात उद्योगांनी स्व प्रमाणपत्र देऊन उद्योग  सुरू केले आहेत. परंतु शासनाने घालून दिलेल्या अटी, शर्ती, सूचनांचे पालन होते की नाही हे बघण्याची कुठलीही प्रशासकीय यंत्रणा अस्तित्वात नाही. उद्योजकांच्या स्वप्रमाणपत्रावर विश्वास ठेवणे अवघड आहे. अनेक उद्योगात त्याचे पालन केले जात नाही. काही उद्योगांवर प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत, परंतु त्याने प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी उद्योजकांनी शासनाच्या अटी शर्तीचे पालन केले, की नाही हे तपासण्याची काटेकोर व्यवस्था करणे आवश्यक आहे. 

दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. कामगार, त्यांच्या कुटुंबीयांना लागण होत आहे. अशा रुग्णांना विलगीकरणासाठी पुरेशी व्यवस्था उपलब्ध नाही. जिल्ह्यातील मोठ्या उद्योगांनी तालुकानिहाय व शहरांमध्ये कोरोना केअर सेंटर, डेडिकेटेड कोरोना हॉस्पिटल उभारण्याचे योगदान द्यावे. यासाठी उद्योगांनी पुढाकार घ्यावा. असे झाल्यास शासन व प्रशासनावरील दबाव कमी होईल. जिल्‍ह्यातील रुग्‍णांना विलगीकरण, उपचार शक्य होईल. 
,,,
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com