मजूर फेडरेशनकडून आमदार हिरामण खोसकरांचे आभार - labour fedration given Thanks to MLA Hiraman Khoskar. Nashik Politics. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

मजूर फेडरेशनकडून आमदार हिरामण खोसकरांचे आभार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 मार्च 2021

ई- निविदा मर्यादेत सात लाखांची वाढ केल्याने याचा फायदा राज्यातील सर्व मजूर संघांना होणार आहे. मात्र, हा प्रश्‍न मिटल्यानंतर फेडरेशनचे अनेक प्रश्‍न प्रलंबित असून, तेदेखील शासन स्तरावर पाठपुरावा करून मार्गी लावणार असल्याचे आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितले.

नाशिक : ई- निविदा मर्यादेत सात लाखांची वाढ केल्याने याचा फायदा राज्यातील सर्व मजूर संघांना होणार आहे. मात्र, हा प्रश्‍न मिटल्यानंतर फेडरेशनचे अनेक प्रश्‍न प्रलंबित असून, तेदेखील शासन स्तरावर पाठपुरावा करून मार्गी लावणार असल्याचे आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितले. 

जिल्हा मजूर संस्थांच्या सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी अध्यक्ष शिवाजी रौंदळ यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन झाली. त्या वेळी ते बोलत होते. ई-निविदेची मर्यादा वाढविल्याबद्दल संचालक मंडळाने आमदार खोसकर, संचालक संपत सकाळे यांचा ज्येष्ठ संचालक राजेंद्र भोसले यांच्या हस्ते सत्कार केला. 

या सभेत अध्यक्ष रौंदळ यांनी संस्थेचा लेखाजोखा मांडला. ई-निविदेची मर्यादा वाढल्याने आता मजूर संस्थांना अधिकची कामे मिळणार असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागातील कामांसाठी मर्यादा दहा लाख असली तरी महापालिकेतील कामांना ही लागू झालेली नाही. महापालिका, नगरपंचायती यांनाही ही लागू करावी, अशी मागणी संजय बलकवडे यांनी केली. यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे संचालक योगेश हिरे यांनी सांगितले.

यावेळी संचालक राजेंद्र भोसले, संभाजी पवार, योगेश गोलाईत, योगेश हिरे, दिनकर उगले, सतीश सोमवंशी, शिवाजी कासव, प्रमोद भाबड, नीलेश आहेर, प्रमोद मुळाणे, हरिभाऊ वाघ, जगन्नाथ वाजे, चिंतामण गावित, सुरेश भोये, विठ्ठल वाजे, शशिकांत उबाळे, शशिकांत आव्हाड, प्रतिभा शिरसाट, आशा चव्हाण, किरण टिळे उपस्थित होते. सचिव सुनील वारुंगसे यांनी आभार मानले.
....

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख