मालेगावाचे कनेक्‍शन गुजरातशी जोडणारी कुत्ता गोळी आहे तरी काय?

मलेगाव शहरात असे हजारो मजूर आणि युवक आहेत, की ज्यांना जेवन नसले तरी चालते. कुत्ता गोली मात्र लागतेच अन्यथा ते वेडेपीसे होतात. पोलिसांनी या प्रकरणात लाक्ष घातल्यावर त्याचे धागेदोरे गुजरातशी जोडले गेल्याचे आढळले. ही कुत्ता गोली असते तरी काय? याची चर्चा सुरु झाली आहे.
मालेगावाचे कनेक्‍शन गुजरातशी जोडणारी कुत्ता गोळी आहे तरी काय?

मालेगाव : मलेगाव शहरात असे हजारो मजूर आणि युवक आहेत, की ज्यांना जेवन नसले तरी चालते. कुत्ता गोली मात्र लागतेच अन्यथा ते वेडेपीसे होतात. हे व्यसन मालेगावच्या या युवकांच्या नसांत एव्हढे भिनले आही, की त्यात लाखोंची उलाढाल होते. पोलिसांनी या प्रकरणात लाक्ष घातल्यावर त्याचे धागेदोरे गुजरातशी जोडले गेल्याचे आढळले. आता सुरतचा पुरवठादार पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे ही कुत्ता गोली असते तरी काय? याची चर्चा सुरु झाली आहे. 

शहरातील कुत्ता गोळी विक्री प्रकरणातही गुजरात कनेक्‍शन उघडकीस आले आहे. गेल्या आठवड्यात विशेष पोलिस पथकाने अटक केलेल्या वसीम शेख याची चौकशी केल्यानंतर सुरत येथून गोळ्या व नशेची औषधे शहरात विक्रीसाठी येत असल्याचे उघडकीस आले. आझादनगर पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करत औषध विक्रेता मेहुलकुमार ठक्कर (रा. सुरत) याला अटक केली. त्याच्या चौकशीनंतर औषध वाहतूक करणारा ट्रकमालक आरिफ सय्यद जावीद (रा. म्हाळदे शिवार) व चालक शेख अफजल जमील (रा. नूरबाग) या तिघांना पोलिसांनी अटक केली. संशयितांच्या ताब्यातून ट्रक (एमएच 41, जी 7776) जप्त करण्यात आला आहे. 

शहरात कुत्ता गोळी विक्री प्रकरणी अटक केलेल्या वसीम शेखकडून सुमारे सव्वातीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. यात कुत्ता गोळीसह गर्भपाताच्या गोळ्या, कोरेक्‍स औषधाचे बॉक्‍स जप्त करण्यात आले होते. शहरात नशेसाठी मोठ्या प्रमाणात अल्प्राझोलम या गोळीचा कुत्ता गोळी म्हणून सर्रास वापर होतो. नशेत संशयित गुन्हेगारी कृत्य करीत असल्याने या प्रकरणाचा छडा लावण्याचे पोलिसांपुढे आव्हान होते. अपर अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीपकुमार पारेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप आव्हाड, पोलिस शिपाई भूषण मोरे, भावसार व सहकाऱ्यांनी कसून चौकशी केल्यानंतर सुरतचे धागेदोरे उघडकीस आले. या पथकाने मेहुलकुमारला अटक केली. वसीमसह तिघा संशयितांना 27 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

शहरात गोळीचे 40 विक्रेते 
शहरात कुत्ता गोळी विक्री करणारे 40 पेक्षा अधिक विक्रेते आहेत. येथील विविध राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी स्थानिक गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कुत्ता गोळी विक्रीला चाप लागला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. गोळी विक्रेत्यांवर कठोर कारवाई झाल्यास युवा पिढी व्यसनापासून व शहर गुन्हेगारीपासून वाचेल. कुत्ता गोळीला सांकेतिक भाषेत बटण संबोधले जाते. गोळी पाउच खिशात सहजासहजी बसत असल्याने विक्री करताना रंगेहाथ पकडणे अवघड होते. त्यातच लहान मुलांचाही गोळ्या पोच करण्यासाठी वापर होऊ लागला आहे. पोलिसांना खात्रीलायक टीप मिळाल्यानंतरच कारवाई शक्‍य होते. शहर व परिसरातील कोणताही औषध विक्रेता यात नाही. यापूर्वी नगर, धुळे येथे कनेक्‍शन मिळाले होते. त्यापाठोपाठ आता गुजरात कनेक्‍शन मिळाले आहे. 
... 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com