आता चर्चा कुंभमेळ्याची...अखाडा परिषद म्हणते, कुंभमेळा होणारच!

हरिद्वार येथे येत्या एप्रिल महिन्यात कुंभमेळा होणार आहे. त्याची तयारी सुरु आहे. कोरोना असली तरीही त्याचा कुंभमेळ्यावर परिणाम होणार नाही. कुंभमेळा होणारच,
आता चर्चा कुंभमेळ्याची...अखाडा परिषद म्हणते, कुंभमेळा होणारच!

नाशिक :  हरिद्वार येथे येत्या एप्रिल महिन्यात कुंभमेळा होणार आहे. त्याची तयारी सुरु आहे. कोरोना असली तरीही त्याचा कुंभमेळ्यावर परिणाम होणार नाही. कुंभमेळा होणारच, असे अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी यांनी सांगितले. 

कोरोना संसर्गामुळे यंदा हज यात्रा, सार्वजनिक गणेशोत्सव यांपासून तर अनेक धार्मिक कार्यक्रम व सण साजरे केले नव्हते. देशात अद्यापही विविध संस्था लॅाकडाऊनच्या प्रक्रीयेत अडकल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नियोजित वेळापत्रकानुसार हरिद्वार (उत्तराखंड) येथे एप्रिल, २०२१ मध्ये होणारा कुंभमेळा होणार की नाही? हा चर्चेचा विषय आहे. कुंभमेळ्याचे प्राथमिक नियोजन व त्याची घोषणा अखाडा परिषदेच्या अध्यक्षांच्या मान्यतेनुसार राज्य शासनाकडून स्थानिक प्रशासनामार्फत होते. 

यासंदर्भात महंत नरेंद्रगिरी `सरकारनामा`ला म्हणाले, कोरोना असला तरी कुंभमेळा होणारच. कारण कुंभमेळा आपल्या नियोजनानुसार विशिष्ठ तिथी व स्थळी होतो. त्यानुसार नुकतीच  गेल्या महिन्या २९ला डेहराडून येथे मुख्यमंत्री त्रिवेंद्र राव यांच्या उपस्थितीत अखाडा परिषदेच्या पादधिकारी व महंतांची बैठक झाली. त्यात कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. सर्व प्रकारे प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. त्याची माहिती यावेळी उत्तराखंड सरकारने सादर केली. महंतांनी देखील आपल्या अखाड्यातंर्गत येणा-या संस्थांना त्याबाबत माहिती दिली आहे. आम्ही आता मुळ स्थानी आलो आहोत. मात्र कुंभमेळ्याच्या तयारीवर आमचे बारीक लक्ष आहे.

यापूर्वी जाहिर झालेल्या नियोजनानुसार हिरद्वारचा कुंभमेळा एप्रिल महिन्यात आहे. त्यात १२ एप्रिलला चैत्र सोमवती अमावस्येला पहिले शाही स्नान होईल. १४ एप्रिलला मकर संक्रांतीला दुसरे आणि चैत्र पोर्णिमेला २७ एप्रिल रोजी तिसरे शाही स्नान होईल. यासंदर्भात राज्य सरकारने प्राथमिक तयारी केली आहे. मात्र कुंभमेळ्याला लाखो भाविकांची गर्दी होतो. त्यासाठी देशभरातून भाविक येतात. देशभरातील अखाडे व त्यांचे अनुयायी एकत्र येतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे केंद्र शासन काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 
... 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com