दिलासा...नाशिकला सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्येत घट !

जिल्ह्यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या काही प्रमाणात घटत असून, सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात चार हजारांहून कमी बाधित आढळले. मंगळवारी (ता. २७) दिवसभरात तीन हजार ६६१ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर चार हजार ९८८ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली.
Corona
Corona

नाशिक : जिल्ह्यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या काही प्रमाणात घटत असून, सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात चार हजारांहून कमी बाधित आढळले. मंगळवारी (ता. २७) दिवसभरात तीन हजार ६६१ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर चार हजार ९८८ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूंची संख्या अद्यापही चिंताजनक असून, ३७ बाधितांचा दिवसभरात मृत्‍यू झाला. 

कोरोनाच्‍या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर जारी केलेल्‍या निर्बंधांमुळे अनेक ठिकाणांवर गर्दी नियंत्रणात आलेली आहे. यातून नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या काही प्रमाणात घटली असली तरी अद्यापही आकडा मोठाच आहे. मंगळवारी नाशिक शहरातील एक हजार ९५४, नाशिक ग्रामीणमधील एक हजार ६७०, मालेगाव महापालिका क्षेत्रातील सोळा, तर जिल्‍हाबाहेरील २१ रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे. दुसरीकडे कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील दोन हजार ६५७, नाशिक ग्रामीणमधील दोन हजार १९८, मालेगावच्‍या ४८ आणि जिल्‍हाबाहेरील ८५ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्ह्यात झालेल्‍या ३७ मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील तेरा आणि नाशिक ग्रामीणमधील २४ रुग्णांचा समावेश आहे. नाशिक ग्रामीण भागात नाशिक तालुक्‍यांतर्गत देवळाली कॅम्‍प, भगूर आणि शेवगे दारणा, पिंपळनेर, चांदवड व निफाड तालुक्‍यांतील प्रत्‍येकी पाच, इगतपुरी व सिन्नर तालुक्‍यांतील प्रत्‍येकी तीन, दिंडोरी तालुक्‍यातील दोन आणि कळवण व त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यांतील प्रत्‍येकी एका बाधिताचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. जिल्ह्यात सद्यःस्‍थितीत ४६ हजार ४७४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

नाशिकला मुंबई, पुण्याएव्हढेच रुग्ण  
जिल्ह्यातील नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या घटली असली तरी राज्‍यातील अन्‍य शहरांच्‍या तुलनेत ही संख्या लक्षणीय आहे. बुहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रात चार हजार १४, तर पुणे महापालिका क्षेत्रात तीन हजार ८७१ कोरोनाबाधित आढळले आहेत. या तुलनेत नाशिक जिल्ह्यात अद्यापही लक्षणीय संख्या आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com