किसान रेल्वे’मुळे नाशिकच्या कृषी उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळेल - Kisan Express Online inagrate at Devlali railway station | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

किसान रेल्वे’मुळे नाशिकच्या कृषी उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळेल

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

केंद्र सरकारच्या वतीने आज देवळाली ते दानापूर येथे सुरू करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या किसान रेल्वेचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातुन उद्घाटन करण्यात आले.

नाशिक : नाशिक जिल्हा हा कृषी साठी अत्यंत महत्वाचा जिल्हा आहे. देशातील पहिली किसान रेल्वे नाशिकमधून सुरू होत आहे. नाशिकची ही निवड सार्थ असून किसान रेल्वेच्या माध्यमातून नाशिकच्या कृषी उत्पादनांना व्यापक बाजार पेठ मिळून या रेल्वेचा सर्वाधिक फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना  होईल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

केंद्र सरकारच्या वतीने आज देवळाली ते दानापूर येथे सुरू करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या किसान रेल्वेचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातुन उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री भुजबळ फार्म येथून सहभागी होताना बोलत होते. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर, रेल्वे मंत्री पियुष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार हेमंत गोडसे, खासदार डॉ.भारती पवार, खासदार डॉ. नरेंद्र जाधव, आमदार सरोज आहिरे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात अधिक प्रगत असलेल्या नाशिक मधून आज पहिली किसान रेल्वे सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी नाशिकची निवड ही अत्यंत योग्य निवड आहे. नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे की आज किसान रेल्वे चे उद्घाटन होत आहे. जिल्ह्यात कांदा पिकाचे उत्पादन अधिक होते, भाव बऱ्याच वेळा भाव नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरतात. तसेच शेतकरी आत्महत्या देखील मोठ्या प्रमाणात होतात. अशा वेळी या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळाला तर शेतकरी आत्महत्या कमी होतील यात शंका नाही.

ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा असते या माध्यमातून केंद्र सरकारने सुरू केलेला हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पाचा फायदा नाशिक जिल्ह्याला अधिक होईल. भारत भरात अनेक किसान रेल्वे सुरू व्हाव्यात. या माध्यमातून देशातील विविध भाग जोडले जातील आणि शेतमालाचा पुरवठा होईल. तसेच देशातील विविध भागातील कृषी उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख