मुंबईतील नऊ मजली इमारतीशी भुजबळांचा संबंध काय? 

परवेजला भुजबळ राहण्याचं भाडं देतात का?
Sarkarnama (52).jpg
Sarkarnama (52).jpg

नाशिक : भाजपचे नेते किरीट सोमय्या Kirit Somaiya यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांच्यावर टीका केली आहे. सोमय्या हे आज नाशिक दैाऱ्यावर आहेत. त्यांनी छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर सोमय्या माध्यमांशी बोलत होते. त्यांनी भुजबळांवर आरोपाचा भडिमार केला. 

किरीट सोमय्या म्हणाले की, भुजबळ यांनी आपल्या संपत्तीचे मालक कोण हे स्पष्ट करून माहिती द्यावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भुजबळ यांना चुकीचे काम केल्याप्रकरणी मंत्रिमंडळातून बाहेर काढावे. अतिशय चुकीच्या पद्धतीप्रमाणे भुजबळ यांनी काम केले आहे.  120 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. आज मी त्यांच्या आर्मस्ट्रॉंग एनर्जी कंपनीची पाहणी केली. या कंपन्यांमध्ये जो पैसा आला आहे तो कुठून आला हे देखील त्यांनी स्पष्ट करावे. या कंपनीमध्ये भुजबळ यांनी आपला पैसा पांढरा केला आहे. शनिवारी मी भुजबळांच्या मुंबईतील घराची पाहणी करण्यासाठी जाणार आहे. 

''मुंबईत सांताक्रुझ येथे भुजबळांची 9 मजली इमारत आहे. या इमारतीत अख्खं भुजबळ कुटुंब राहतं. या बिल्डिंगची त्यांचा संबंध काय? ही इमारत परवेज कन्स्ट्रक्शनच्या नावाने आहे. त्याच्याशी तुमचा संबंध काय? या इमारतीचं भाडं तुम्ही भरता की ही इमारतच तुम्ही विकत घेतली आहे? इथे एक खोली कुणी कुणाला राहायला देत नाही, तिथे भुजबळांना 9 मजली इमारत कशी दिली?, ही इमारत बांधण्यासाठीचा पैसा कुठून आला? असे सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. परवेज कन्स्ट्रक्शन ही बोगस कंपनी असून या कंपन्या चालवणारे लोक बनावट आहेत,'' असा आरोप सोमय्या यांनी केला.  ''भुजबळांनी या परवेजशी आणि इमारतीशी काय संबंध आहे हे स्पष्ट करावं, या परवेजला भुजबळ राहण्याचं भाडं देतात का? की त्यांच्याकडून ही इमारत विकत घेतली आहे, याचा खुलासाही भुजबळ यांनी करावा,'' अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

उद्धव ठाकरेंना आवाहन
''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना माझे आवाहन आहे की भुजबळ मुंबईत ज्या घरात राहतात ते घर कोणाचे हे शोधून दाखवा आणि ज्यांनी चुकीचे काम केले म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा. आयकर विभागाने पनवेल नाशिक अंधेरी या ठिकाणी असलेली मालमत्ता जप्त केलेली आहे.,'' असे सोमय्या यांनी सांगितले.  ''या यादीतील  पुढचा खेळाडू कोण,'' असे विचारले असता सूचक वक्तव्य करत जितेंद्र आव्हाड हे 12 वे खेळाडू असल्याचे त्यांनी सांगितले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com