इगतपुरीत अडकलेल्या रेल्वे प्रवाशांना दिली चहा अन् बिस्कीटे! - Kiran Phaltankar Distribute buiscits to stuck Passengers; Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

इगतपुरीत अडकलेल्या रेल्वे प्रवाशांना दिली चहा अन् बिस्कीटे!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 23 जुलै 2021

दोन दिवसांपासून अतिवृष्टी झाल्याने कसारा घाटात दरड कोसळली. त्यामुळे इगतपुरीहुन मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाड्या पहाटेपासून स्थानकातच थांबविण्यात आल्या. त्यामुळे प्रवासी रेल्वेतच अडकले. या प्रवाशांना आधार मिळाला, किरण फलटणकर या कार्यकर्त्याचा. त्यांनी या तीन हजार प्रवाशांना चहा-बिस्कीटे देऊन त्यांची क्षुधाशांती केली. 
 

इगतपुरी : दोन दिवसांपासून अतिवृष्टी झाल्याने कसारा घाटात दरड कोसळली. (Land sliding in Kasara Ghat due to Heavy rain) त्यामुळे इगतपुरीहुन मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाड्या पहाटेपासून स्थानकातच थांबविण्यात आल्या. (Mumbai Railway traffic closed)  त्यामुळे प्रवासी रेल्वेतच अडकले. या प्रवाशांना आधार मिळाला, किरण फलटणकर (Kiran Phaltankar) या कार्यकर्त्याचा. त्यांनी या तीन हजार प्रवाशांना चहा-बिस्कीटे देऊन त्यांची क्षुधाशांती केली.  

रेल्वेस्थानकात अडकलेल्या या प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने सर्वच प्रवाशांना पुढील प्रवासासाठी लालपरीची (एसटी)  मदत घेत कल्याण व ठाण्यापर्यंत पोचविण्याचे काम सुरू केले होते. हे सुरू असताना जवळपास  तीन हजार प्रवासी बांधवांना जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने चहा-बिस्किटे  देण्यात आली. मध्य रेल्वेच्या कसारा घाटासह अन्य दोन ठिकाणी दरडी कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वे प्रशासनाने पुढील प्रवासासाठी एसटी बसची व्यवस्था केली होती. मात्र अनेक प्रवासी पावसाने भिजले होते. इगतपुरीच्या प्रचंड पावसाच्या भागात हे प्रवासी थंडीने कुडकुडत होते. अनेक महिला प्रवाशांकडे लहान मुले होती. त्यामुळे हा उपक्रम राबविल्याचे श्री. फलटणकर यांनी सांगितले.

याप्रसंगी श्री. फलटणकर, शांतिलाल चांडक, वीरेंद्र परदेशी, सुभाष भारती, रामदयाल वर्मा, शैलेश शर्मा, आकाश खारके, सागर परदेशी, योगेश गुप्ता, कृष्णा करवा यांनी परिश्रम घेतले. 

यावेळी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार, परमेश्वर कासुळे यांच्या  आवाहनाला प्रतिसाद देत हा उपक्रम राबविण्यात आला.
...
हेही वाचा...

हेलिकाॅप्टर कोसळल्यावर `ती`ने अंगावरचं लुगडं फेडून जखमीसांठी झोळी केली

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख