तिसऱ्या लाटेसाठी ऑक्सिजनचा तिप्पट साठा करा - Keep sufficient Oxigen in storage for third wave, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

तिसऱ्या लाटेसाठी ऑक्सिजनचा तिप्पट साठा करा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 29 जून 2021

कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी शहरामधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तिप्पट साठा करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना दिल्या.

नाशिक : कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी शहरामधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तिप्पट साठा (make tripple storage capacity of oxigen for third wave) करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Chief secretary Sitaram Kunte) यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव (Kailas Jadhav) यांना दिल्या. 

डेल्टा प्लस व्हेरिएंटचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्याचे मुख्य सचिव कुंटे यांनी महापालिका आयुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधला. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची माहिती श्री. कुंटे यांनी घेतली.

तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये म्हणून महापालिकेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. पहिल्या व दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट अधिक भयावह असण्याची शक्यता असल्याने दुसऱ्या लाटेत जितका ऑक्सिजन वापरला गेला, त्याच्या तिप्पट साठा करण्याच्या सूचना श्री. कुंटे यांनी महापालिका आयुक्त जाधव यांना दिल्या. 

शहरात २४० टन ऑक्सिजन साठा 
शहरात दुसऱ्या लाटेत रोज ८० टन ऑक्सिजनची आवश्यकता होती. त्याचा विचार करून तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी रोज २४० टन ऑक्सिजन लागेल, असा अंदाज बांधला जात आहे. त्यादृष्टीने महापालिकेने तयारी केल्याची माहिती आयुक्त जाधव यांनी दिली. २४० टन ऑक्सिजनमध्ये २० टक्के साठा सिलिंडरच्या माध्यमातून, दहा टक्के पी. एस. प्रकल्पातून उपलब्ध केला जाणार आहे. उर्वरित ७० टक्के साठा लिक्विड ऑक्सिजनच्या स्वरूपात राहणार असल्याची माहिती देण्यात आली. 

२७ ऑक्सिजन प्लांट 
तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून २७ ऑक्सिजन प्लांट (पीएसए) उभारले जात असल्याची माहिती देण्यात आली. या माध्यमातून २७.६६ टन ऑक्सिजन साठा उपलब्ध होणार आहे. त्याव्यतिरिक्त १९७ ऑक्सिजन टाक्या उपलब्ध राहणार आहेत. महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात २० किलो लिटर क्षमतेच्या दोन ऑक्सिजन टाक्या बंफर स्टॉक म्हणून ठेवल्या जाणार आहेत. त्यासाठी निविदा काढल्या जाणार असल्याची माहिती आयुक्त जाधव यांनी दिली. 

`झाकिर हुसेन`ची पुनरावृत्ती टाळणार 
डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन भरताना गळती होऊन २४ लोक मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व ऑक्सिजन प्लांटच्या ठिकाणी पर्यायी ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दोन हजार जम्बो सिलिंडर खरेदी केले जाणार आहेत. जुलैअखेरपर्यंत महापालिकेला सिलिंडर प्राप्त होतील. या माध्यमातून ७० टन ऑक्‍सिजनचा साठा केला जाणार आहे. संभाजी स्टेडियम, ठक्कर डोम व अंबड येथील प्रस्तावित कोविड सेंटरमध्ये जम्बो सिलिंडर दिले जातील. 
....
हेही वाचा...

नाशिकच्या अतिरिक्त SP शर्मिष्ठा यांची धडाकेबाज कारवाई...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख