कोरोनाला रोखण्यासाठी राज्याच्या सीमा सुरक्षित ठेवा - keep state borders safe to prevent Covid19, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्याच्या सीमा सुरक्षित ठेवा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 मे 2021

खासदार डॉ. भारती पवार यांनी मंगळवारी स्थानिक प्रशानासोबत बैठक घेऊन सीमावर्ती भागात नाकाबंदी वाढविण्यासह उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या आहेत.

नाशिक : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने जिल्हाबंदी जाहीर केली असली, तरीही यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे गुजरातचा सीमावर्ती भाग कोरोना स्प्रेडर्स बनल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. त्यानंतर खासदार डॉ. भारती पवार यांनी मंगळवारी स्थानिक प्रशानासोबत बैठक घेऊन सीमावर्ती भागात नाकाबंदी वाढविण्यासह उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या आहेत.

गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातून राज्याच्या सीमावर्ती भागातील हतगड, तळपाडा, श्रीभूवन, करंजूल (क), खुंटविहीर, पिंपळसोंड, हडकाईचोंड, बर्डीपाडा, रघतविहीर, मांधा, निंबारपाडा, राक्षस भुवन, सागपाडा, खिर्डी गावे जवळ आहेत. ये-जा करण्यासाठी ई-पास घेणे आवश्यक असतानाही नाकाबंदीबाबत प्रशासनाचे कागदी घोडे नाचविणे सुरू होते. याबाबत ‘सकाळ'च्या बातमीदारांनी आढावा घेऊन सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल खासदार डॉ. भारती पवार यांनी घेऊन प्रशासनाची झाडाझडती घेतली. या बैठकीला तहसीलदार किशोर मराठे, पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, गटविकास अधिकारी दीपक भावसार, तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर आदी उपस्थित होते.

उपाययोजनेच्या सूचना
या गावात नाकाबंदी करण्यासाठी वनविभागाचे उपतपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी वनविभागाचे कर्मचार्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. याच सीमावर्ती भागाला कोरोनाचा विळखा पडला असून, नागरिकांची ये-जा थांबविण्यासाठी बोरगाव, बर्डीपाडा, उंबरठाण, बा-हे या ठिकाणी कोरोना चाचणी केंद्रे सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या परिसरातील नागरिकांना नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठांपेक्षा गुजरातमध्ये जाणे सोयीचे व जवळचे आहे. त्यामुळे या भागात दोन्ही राज्यात त्यांचा मुक्त संचार व वावर असतो. त्यांचे जा ये सुरु असल्याने कोरोना संसर्ग वाढण्यास हातभार लागतो. त्यादृष्टीने राज्य शासनाने जिल्हाबंदीचा आदेश काढला होता. त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
....
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख