जितेंद्र आव्हाड पूजेला आले, अन् आरती करून गेले! - Jitendra Avhad came for worship in nashik Temples, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

जितेंद्र आव्हाड पूजेला आले, अन् आरती करून गेले!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 जुलै 2021

हिंदूत्ववाद्यांना परखड भाषेत उत्तर देत असल्याने सतत हिंदूत्ववाद्यांच्या टिकेचे लक्ष्य राहिलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड काल शहरात आले होते. यावेळी ते शहरातील पेशवेकालीन नवश्या गणपती मंदिरात पूजेला गेले. 
 

नाशिक : हिंदूत्ववाद्यांना परखड भाषेत उत्तर देत असल्याने सतत हिंदूत्ववाद्यांच्या टिकेचे लक्ष्य राहिलेले (Always being a expositor of Hindutwa) राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड काल शहरात आले होते. (Jitendra Avhad visit nashik yesterday for worship in temple) यावेळी ते शहरातील पेशवेकालीन नवश्या गणपती मंदिरात पूजेला गेले. मात्र याच वेळी आरती सुरु असल्याने पुजाऱ्यांनी त्यांना गाभाऱ्यात येऊन त्यांच्या हस्ते आरती केली. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला. 

श्री. आव्हाड यांचा हा दौरा पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना देखील माहिती नव्हता. ते नवश्या गणपतीला ते देवदर्शनाला आले होते. आनंदवली येथील मंदिरात ते पूजेला गेले. यावेळी त्यांच्या समवेत मंदिराचे अध्यक्ष श्री. जाधव तसेच मुंबईहून आलेले कार्यकर्ते होते. श्री. आव्हाड मंदिरात गेले तेव्हा आरतीची वेळ होती. त्यामुळे पुजारी आरती करीत होते. त्यामुळे पुजाऱ्यांनी त्यांना आरती करण्यासाठी बोलावले. त्यानंतर श्री. आव्हाड यांच्या हस्ते आरती झाली. जवळपास अर्धा तास येथे मंदिरात होते. त्यानंतर ते त्र्यंबेकश्वरला देवदर्शनासाठी गेले. 

यावेळी त्यांना पत्रकारांनी दौऱ्याबद्दल विचारणा केली असता, मी खाजगी भेटीसाठी आलो आहे. त्यामुळे त्याबाबत काहीही बोलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईत सुरु असलेला पाऊस त्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीविषयी विचारणा केल्यावर ते म्हणाले, मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे विविध भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. राज्य शासन संबंधीत यंत्रणा याबाबत अतिशय वेगाने मदतकार्य करीत आहे. आपत्ती व्यावस्थापन कक्ष देखील लक्ष ठेऊन आहे. 

मनसेप्रमुख राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या नाशिक शहरात आहेत. त्यांची भेट झाली. त्यांनी राजकीय चर्चा देखील केली. याविषयी आपले काय मत आहे, त्यावर श्री. आव्हाड म्हणाले, `भेटले तर भेटू द्या. त्यावर मी काय बोलणार?`  
...
  हेही वाचा...

विरोधकांना विश्वासात घेण्याचा मोदींचा प्रयत्न !

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख