`शेकाप`च्या जयंत पाटलांच्या एस. जे. शुगरची साखर सील

रावळगाव येथील एस. जे. शुगर साखर कारखान्याकडे २०२०-२१ मधील गळीत हंगामामधील एफआरपीपोटी १७ कोटी ९८ लाख ७६ हजार रुपये रक्कम थकीत आहेत. थकीत एफआरपी वसुलीसाठी साखर आयुक्तांच्या आदेशान्वये, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार येथील तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी एस. जे. शुगरची २३ कोटी ७१ लाख रुपयांची साखर, ३५ लाखांची कच्ची साखर, मोलॅसेस व बॅग असा एकूण २४ कोटी ८२ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज सील करून ताब्यात घेतला.
Jayant Patil
Jayant Patil

मालेगाव : रावळगाव येथील एस. जे. शुगर साखर कारखान्याकडे २०२०-२१ मधील गळीत हंगामामधील एफआरपीपोटी १७ कोटी ९८ लाख ७६ हजार रुपये (Non payment of saugarcane payment 17.98 cr.) रक्कम थकीत आहेत. थकीत एफआरपी वसुलीसाठी साखर आयुक्तांच्या (Sugar commissioner order to seal Sugar) आदेशान्वये, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार येथील तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी एस. जे. शुगरची २३ कोटी ७१ लाख रुपयांची साखर, ३५ लाखांची कच्ची साखर, मोलॅसेस व बॅग असा एकूण २४ कोटी ८२ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज सील (24.82 cr. Sugar and other products sealed) करून ताब्यात घेतला.

साखर कारखान्यांच्या ऊस नियंत्रण आदेशान्वये १९६६ च्या कलम ३ (३) मधील तरतुदीनुसार हंगामामधील गाळप केलेल्या उसाचे १४ दिवसांत किमान एफआरपीप्रमाणे ऊस पुरवठादारांना अदा करणे बंधनकारक असताना, एस. जे. शुगरने ऊस पुरवठादारांची रक्कम थकविली आहे. याबाबत साखर संचालनालयाने कारखान्याला नोटीस दिली होती. थकीत एफआरपीप्रमाणे १९ मेस सुनावणीही झाली होती. अखेर पुणे येथील साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नाशिक येथील सहकारी संस्थांच्या विशेष लेखापरीक्षकांना कारवाईचे आदेश दिले. विशेष लेखापरीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारखान्याची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्याची सूचना केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार श्री. राजपूत, मंडलाधिकारी दौलत गणोरे, तलाठी चंद्रकांत महाले यांनी रावळगावचे सरपंच महेश पवार, कारखान्याचे लेखापरीक्षक अभ्यंकर आदींच्या उपस्थितीत जप्ती करून कारखान्याच्या गुदामाला सील ठोकले.

या कारवाईत २३ कोटी ७१ लाख रुपयांची ७६ हजार ५१२ क्विंटल साखर, एक हजार ४०२ क्विंटल ३५ लाखांची कच्ची साखर, ७५ लाख ९९ हजार रुपयांचे ९४९ टन मोलॅसेस व सुमारे १२ हजार रुपयांच्या १० टन बॅगा, असा एकूण २४ कोटी ८२ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

थकीत रक्कम मिळण्याची शेतकऱ्यांना आशा
एस. जे. शुगरला २०२०-२१ च्या गळीत हंगामासाठी हजारो शेतकऱ्यांनी ऊस दिला. मात्र, त्यांना अद्याप उसाचे पेमेंट मिळालेले नाही. विविध पक्षांनी याप्रश्‍नी आंदोलनाचा इशारा दिला होता. शेतकऱ्यांचा वाढता असंतोष व थकबाकी लक्षात घेता साखर आयुक्तांनी कठोर कारवाईचा निर्णय घेतला. साखर आयुक्तालयाने ही कारवाई केल्यानंतर जप्त ऐवजाचा लिलाव होऊ शकतो. यामुळे ऊसपुरवठा शेतकऱ्यांच्या थकीत रक्कम मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

...
जयंत पाटील यांचे स्वप्न!
रावळगाव साखर कारखाना तसेच गावाला राजकीय व सामाजिक विचारधारेचा दिर्घ वारसा आहे. पुरोगामी चळवळीसाठी हा परिसर प्रसिद्ध होता. त्यातूनच (कै) भाऊसाहेब हिरे यांनी या कारखान्यासाठी पुढाकार घेतला होता. या भागात शेकापसह पुरोगामी चळवळ चांगलीच रुजली होती. हा इतिहास असल्याने जयंत पाटील यांनी परिसर व शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कारखाना सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र व्यवसायातील आव्हाने व स्पर्धेमुळे त्यात अडथळे आले आहेत. त्यातून ते कसा मार्ग काढतात हे लवकरच स्पष्ट होईल.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com