जयंत पाटील म्हणाले, `राष्ट्रवादी`च्या विस्तारासाठी नाशिकला मी पुन्हा येईन! 

सरकार स्थापन झाल्यानंतर देशात आणि राज्यात दुर्दैवाने कोरोनाची महामारी पसरली. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यातून मार्ग काढत शासन जनतेच्या हिताचे धोरणात्मक निर्णय घेत आहे.
जयंत पाटील म्हणाले, `राष्ट्रवादी`च्या विस्तारासाठी नाशिकला मी पुन्हा येईन! 

नाशिक : सरकार स्थापन झाल्यानंतर देशात आणि राज्यात दुर्दैवाने कोरोनाची महामारी पसरली. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यातून मार्ग काढत शासन जनतेच्या हिताचे धोरणात्मक निर्णय घेत आहे. कोरोनाचे सूक्ष्म नियोजन व उपाययोजना केल्याने राज्याच्या तुलनेत नाशिकचा मृत्युदर कमी करण्यात यश मिळाले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपसल्थितीत ही बैठक झाली. नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, आज जिल्ह्यातील जलसिंचन आढावा बैठक घेण्यात आली. पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी वळण योजनांच्या माध्यमातून वळविण्यात येत आहे. याबाबत आढावा घेतला असून नाशिकच्या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आपले प्रयत्न सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझे कुटुंब माझी जबाबदारी योजना हाती घेण्यात आली आहे.. योजनेच्या यशस्वीतेसाठी नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सजग रहावे.

श्री. पाटील यांनी बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली. यासंदर्भात जिल्ह्यात तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबविली जात आहे. त्याचा अनेक तरुणांना फायदा मिळत असल्याने समाधान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अभिप्राय योजनेला जिल्ह्यात चांगले यश मिळाले आहे. अनेक प्रश्न आपल्यापर्यंत आले आहेत. त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले जातील. पक्ष संघटना वाढविण्यासाठी सक्षमपणे काम करणारे लोक पुढे यायला पाहिजे यासाठी प्रयत्न करु. लवकरच पुन्हा जिल्ह्याचा दौरा करून पक्षाचे बैठक घेऊ असे सांगितले.

यावेळी माजी आमदार हेमंत टकले, आमदार सरोज आहेर, माजी आमदार जयवंतराव जाधव, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, नानासाहेब महाले, विश्वास ठाकूर, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, दिलीप खैरे, निवृत्ती अरिंगळे, अर्जुन टिळे, अशोक सावंत, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव गौवर्धने, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड आदी उपस्थित होते. 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=ae86FeiIZH8AX-ExFYz&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=cd275fff7236ca0bf30235882962765a&oe=5F8FE6A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com