जनविकास प्रतिष्ठान नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी पाठपुरावा करणार

अतीवृष्टी झालेल्या आदिवासी तसेच अन्य जिल्ह्यातील शेतीची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. त्याची तीव्रता एव्हढी मोठी आहे, की मंत्री व शासनाचे प्रतिनिधी त्याचा वास्तव अंदाज बांधू शकणार नाहीत. त्यामुळे यासंदर्भात जनविकास प्रतिष्ठान याबाबत नुकसानग्रस्तांशी संपर्क करुन त्यांना मदत मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
जनविकास प्रतिष्ठान नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी पाठपुरावा करणार

नाशिक : अतीवृष्टी झालेल्या आदिवासी तसेच अन्य जिल्ह्यातील शेतीची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. त्याची तीव्रता एव्हढी मोठी आहे, की मंत्री व शासनाचे प्रतिनिधी त्याचा वास्तव अंदाज बांधू शकणार नाहीत. त्यामुळे यासंदर्भात जनविकास प्रतिष्ठान याबाबत नुकसानग्रस्तांशी संपर्क करुन त्यांना मदत मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रविण संखे यांनी दिली. 

संस्थेच्य़ा पदाधिका-यांची बैठक नुकतीच जव्हार येथे झाली. यावेळी संस्थेच्या  पालघर जिल्हा परिषदेच्या प्रथम महिला अध्यक्ष सौ सुरेखा ताई  थेतले यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संखे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. 

पालघर जिल्हा परिषदेच्या प्रथम अध्यक्ष म्हणून मान मिळवलेल्या सुरेखाताई  थेतले यांची पालघर जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर श्री. संखे यांनी जव्हार, पालघर, नाशिकसह विविध आदिवासी जिल्ह्यांतील अतीवृष्टीग्रस्त भागाची माहिती संकलीत करण्याचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती दिली. संस्थेचे सर्व पदाधिकारी या कामात व्यस्त आहेत. 

जनविकास प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था आदिवासी, गरीब व गरजू लोकांसाठी सेवाकार्य करीत आहे. या प्रतिष्ठानद्वारे गरजूंना धान्य वाटप, शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुस्तके, गणवेश वाटपाचे काम गेल्या पाच वर्षांपासून करीत आहे. जिल्ह्यातील युवा व बेरोजगारांना नोकरी व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे. 

पालघर जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य असलेल्या सुरेखाताई  थेतले यांनी पालघर जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सांगितले, की जव्हार मोखाडा खोडाळा व विक्रमगड या दुर्गम आदिवासी भागात रोजगार उपलब्ध नसल्याने,  अनेक समस्यांना लोकांना तोंड द्यावे लागत आहे. या डोंगराळ आदिवासी दुर्गम भागात येथील जनतेला शेतीवरच अवलंबून राहावे लागते. त्यांना उदारनिर्वाहासाठी कोणतेही इतर स्रोत, साधने उपलब्ध नाहीत. प्रतिष्ठानच्या माध्यमातून जनसेवा व लोककल्याण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू.

यावेळी सावरगाव सरपंच विठ्ठल  थेतले, प्रतिष्ठानचे पदाधिकारी मिलिंद बोंड, सुधीर घाटाळ, माणिक कडू, सुदाम  धांगडा, सुनील कुंभारे उपस्थित होते.
...
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&ccb=2&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=PeSO4OJJ3PsAX8VPLnM&_nc_ht=scontent.fdel1-3.fna&oh=96052d212849da267e86483e12ccca6b&oe=5FB773A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com