जळगावच्या प्रांताधिकाऱ्यांना वाळू ठेकेदाराकडून लाच घेताना अटक 

जळगाव येथील प्रांताधिकारी श्रीमती दीपमाला चौरे व लिपिक अतुल सानप यांना वाळू वाहतूकदारांकडून सव्वा लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (ता. 21 ऑगस्ट) अटक केली आहे.
Jalgaon sub-divisional officer arrested for taking bribe from sand contractor
Jalgaon sub-divisional officer arrested for taking bribe from sand contractor

जळगाव : जळगाव येथील प्रांताधिकारी श्रीमती दीपमाला चौरे व लिपिक अतुल सानप यांना वाळू वाहतूकदारांकडून सव्वा लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (ता. 21 ऑगस्ट) अटक केली आहे. वाळू वाहतूकदारांकडे ट्रक सोडण्यासाठी त्यांनी दोन लाख रूपयांची मागणी केली होती. 

जळगावात वाळू वाहतूक करणाऱ्या कंत्राटदाराकडे गौण खनिजकर्म अधिकारी बुलडाणा यांचा वाळू वाहतुकीचा परवाना होता. मात्र, या वाहतूकदाराचे वाळू वाहतूक करणारे दोन ट्रक जळगावच्या तहसील पथकाने पकडून एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या आवारात उभे केले होते. हे ट्रक सोडण्याच्या मोबदल्यात प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांनी लिपीक अतुल सानप यांच्या माध्यमातून दोन लाख रूपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती सव्वा लाख रूपये देण्याचे ठरले होते. 

या संदर्भात वाळू वाहतूकदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे भागाचे पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव यांनी सापळा रचून लिपीक अतुल सानप यांच्या खासगी पंटरला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रक्कम स्वीकारताना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याने प्रांताधिकारी दीपमाला चौरे आणि लिपिक सानप यांच्यासाठी रक्कम स्वीकारत असल्याचे सांतिल्याने त्या दोघांनाही अटक करण्यात आली. 

पोलिस हेडकॉन्स्टेबल अशोक अहिरे, पोलिस नाईक मनोज जोशी, सुनील शिरसाठ, पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, नासीर देशमुख, ईश्‍वर धनगर यांनी ही कारवाई केली. 


हेही वाचा : सोवळ्यावर जपून बोला; नाही तर जानवेधारी राहुल गांधींना राग यायचा! 

मुंबई : "जातीच्या पलीकडेही जगात काही असते, यावर कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना बहुधा विश्‍वास नसावा. सोवळ्यावर त्यांनी जरा जपूनच बोलावे, नाही तर जानवेधारी राहुल गांधी यांना राग यायचा,' असा टोला भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. 

उत्तर प्रदेश राज्यातील आझमगड जिल्ह्यातील बासगाव येथील दलित युवा सरपंचाचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत तेथे गेले होते. मात्र, त्यांना यूपी पोलिसांनी सीमेवरच अडवून महाराष्ट्रात परत पाठविण्यात आले होते. 

त्यावर "मी उत्तर प्रदेशचा अतिथी होतो, तरीही तेथील सरकारने माझ्याशी अशा पद्धतीने व्यवहार केला. त्यावरून उत्तर प्रदेश सरकारने आपली संस्कृती काय आहे, हे दाखवून दिले आहे,' अशी टीका त्यांनी उत्तर प्रदेशमधील भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर केली होती. 

त्याला राज्यातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले होते. महाराष्ट्रातील जनता वाढीव वीजबिलांनी त्रस्त असताना ऊर्जामंत्री डॉ. राऊत हे उत्तर प्रदेशच्या राजकीय दौऱ्यावर गेले आहेत. उत्तर प्रदेशची जबाबदारी कॉंग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. त्यामुळे आपली कार्यतत्परता दाखविण्यासाठी त्यांच्यासमोर जाणे, ही ऊर्जामंत्र्यांची राजकीय गरज असल्याची टीका आमदार पाटील यांनी केली होती. 

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्याला प्रत्युत्तर देताना आमदार चंद्रकांत पाटील यांना निवडणुकीसाठी कोल्हापुरातून सुरक्षित मतदारसंघ असलेल्या पुण्यातील कोथरुडमध्ये आल्याची आठवण करून दिली होती. चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या मनातील दलितांसाठीचे प्रेम अधिक प्रदर्शित करू नये, त्यामुळे कोथरुडकर मतदारांचं सोवळं मोडेल आणि पुढच्या वेळी पुन्हा सुरक्षित मतदारसंघ शोधण्याची धावपळ करावी लागेल, असा सणसणीत टोला राऊत यांनी लगावला होता. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com