राष्ट्रवादी आंदोलनाच्या पावित्र्यात ; जळगावमध्ये राजकारण तापणार

जळगाव जिल्ह्यात टोलवरुन राजकारण तापणार असल्याचे चिन्हे दिसत आहे.
राष्ट्रवादी आंदोलनाच्या पावित्र्यात ; जळगावमध्ये राजकारण तापणार
Sarkarnama - 2021-09-15T093738.999.jpg

जळगाव : केंद्रीय रस्ते विभागातर्फे जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद (Nasirabad) ते मुक्ताईनगर (Muktainagar) चौपदरी रस्त्यांचे काम सुरू आहे, त्याची टोल वसुली आजपासून (ता.१५) सुरु करण्यात येत आहे.मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने (Jalgaon NCP) त्याला विरोध केला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधामुळे जळगाव जिल्ह्यात टोल सुरू होण्याबरोबर टोल विरोधात राजकारण ही तापणार असल्याचे चिन्हे दिसत आहे.

नशिराबाद ते मुक्ताईनगर असा चौपदरीकरण महामार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे, त्यातील काही भागाचे काम पूर्ण झाले, नशिराबाद ते भुसावळपर्यंत रस्त्याचे काही अंशी काम झाले आहे. मात्र, या रस्त्याचे मोठ्या प्रमाणात काम बाकी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे. आता याच रस्त्यावर नशिराबाद येथे टोल नाका सुरू करण्यात येणार आहे. आजपासून  (ता.१५) हा नाका सुरू करण्यात येत असून त्याचे वाहनाचे दरही जाहीर करण्यात आले आहे.

OBC Reservation : राज्य मंत्रिमंडळ आज काय निर्णय घेणार 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र हा टोल नाका सुरू होण्याच्या पूर्व संध्येला विरोधाचे हत्यार उपसले आहे. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने टोल नाका सुरू करण्यास विरोध केला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अँड रवींद्र पाटील यांनी सांगितले की, या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण  झालेले नाही, मात्र, त्याची टोल वसुली सुरू करून जनतेला आतापासून भुर्दंड देण्यात येत आहे. ही वसुली अत्यंत चुकीची आहे. जनतेवर हा अन्याय आहे. 

राष्ट्रीय महामार्ग विभागाने अगोदर या रस्त्याचे काम पूर्ण करावे  त्यानंतर टोल घ्यावा मात्र आता टोल सुरू करण्यास आमचा तीव्र विरोध आहे. या बाबत आपण आज (ता १५) जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत, तरीही टोल सुरू राहिला तर तीव्र आंदोलन पक्षातर्फे करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधामुळे जळगाव जिल्ह्यात टोल सुरू होण्याबरोबर टोल विरोधात राजकरण ही तापणार असल्याचे चिन्हे दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in