जळगावात भाजप,शिवसेनेत खडड्यावरून कुरघोडी, जनता मात्र त्रस्त 

जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता आहे. तर शिवसेना विरोधीपक्ष आहे. शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवावेत यासाठी शिवसेनेने रस्त्यावर "कमळ' लावण्याचे प्रतिकात्मक आंदोलन केले होते.
जळगावात भाजप,शिवसेनेत खडड्यावरून कुरघोडी, जनता मात्र त्रस्त 

जळगाव : जळगाव शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी शिवसेनेत वाद सुरू आहे. परंतु महापालिका खड्डे बुजविण्याच्या बाबतीत कोणतीही हालचाल करीत नसल्याने सर्वसामान्य जनता मात्र त्रस्त झाली आहे. 

शहरात रस्त्यावर मोठेमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. वाहनधारकांना वाहन चालविण्यासाठी अक्षरक्ष: कसरत करावी लागत आहे. नागरिकांनी तक्रारी करूनही महापालिका मात्र खड्डे बुजविण्याबाबत कोणतीही हालचाल करण्यास तयार नाही. दुसरीकडे सत्ताधारी भाजप आणि विरोधी शिवसेना यांच्या खड्डयावरून वाद सुरू झाले आहेत. 

जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता आहे. तर शिवसेना विरोधीपक्ष आहे. शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवावेत यासाठी शिवसेनेने रस्त्यावर "कमळ' लावण्याचे प्रतिकात्मक आंदोलन केले होते. त्यानंतर सतरा मजली इमारतीच्या आवारात कुंभकर्ण आंदोलन करून प्रशासनाने त्वरीत जागे व्हावे अशी मागणी केली आहे. शिवसेनेच्या या आंदोलनामुळे शहरातील खड्डे बुजविण्यबाबत सत्ताधारी भाजप दखल घेईल अशी अपेक्षा होती. मात्र आता या खड्डयावरूनच दोन्ही पक्षात वाद सुरू झाले आहेत. 

भाजपचे शिवसेनेवर आरोप 
जळगाव महापालिकेत आज विरोधी असलेली शिवसेना एकेकाळी सत्तेवर होती. शिवसेना नेते माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील खानदेश विकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता होती. त्यावेळी भाजप विरोधी होती. त्यावेळी शहरातील रस्त्याच्या खड्डयांचा प्रश्‍न कायम होता, त्यावेळी खड्डे बुजविण्यासाठी भाजपतर्फे आंदोलन करण्यात येत होते. त्याची आठवण आज भाजपने करून दिली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर थेट सेनेवर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे, की जळगावच्या रस्त्याचे फोटो टाकून काही जण असे भासवत आहे, 2018 च्या आधी जळगाव सिंगापूर होते. आणि नंतर जळगाव झाले. 

जळगावकर त्रस्त 
खड्डयावरून महापालिकेतील दोन्ही पक्षाचे वाद सुरू असतांना जळगावातील जनता मात्र त्रस्त झाली आहे. महापालिका निवडणूकीत भाजपने आम्हाला सत्ता द्या आम्ही एका वर्षात जळगाव शहराचा कायापालट करून दाखवितो असे आश्‍वासन दिले होते. जळगावकरांना भाजपला 75 पैकी तब्बल 57 नगरसेवकसेवक निवडून देवून एकहाती सत्ता दिली. सत्ता मिळून आज दोन वर्षे झाल्यांनंतरही शहरातील रस्त्यावरचे खड्डेही बुजविले नसल्याने नागरिकांमध्येही सत्ताधारी भाजपविरूध्द नाराजीचा सूर आहे. पक्षांनी वाद थांबवून प्रथम शहरातील खड्डे बुजविण्याकडे लक्ष द्यावे अशी मागणीही नागरिक करीत आहेत.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com