प्रेसच्या `सीएसआर` फंडातून ऑक्सिजनसाठी १.६० कोटींचा निधी - ISP, CNP help 1.60 Cr. fund to Hospitals for oxygen. Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

प्रेसच्या `सीएसआर` फंडातून ऑक्सिजनसाठी १.६० कोटींचा निधी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 मे 2021

कोरोनाच्या लढयात विविध सामाजिक संस्था पुढे येत आहेत. यामध्ये आता भारत प्रतिभूती मुद्रणालयाने देखील एक पाऊल पुढे टाकले आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून सिन्नर, इगतपुरी, आणि देवळाली कॅम्प येथील कॅन्टोमेन्ट बोर्ड या तीन रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी १.५९ कोटीचा निधी मंजूर केला आहे.

नाशिक : कोरोनाच्या लढयात विविध सामाजिक संस्था पुढे येत आहेत. यामध्ये आता भारत प्रतिभूती मुद्रणालयाने देखील एक पाऊल पुढे टाकले आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून सिन्नर, इगतपुरी, आणि देवळाली कॅम्प येथील कॅन्टोमेन्ट बोर्ड या तीन रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी १.५९ कोटीचा निधी मंजूर केला आहे. या तिन्ही रुग्णालयांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये देण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्णांना उपचाराच्या सुविधांत विविध अडचणी येत आहेत.  यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्रेस व्यवस्थापनाला याबाबत पत्र देऊन मदतीसाठी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर यांनी पाठपुरावा केला. प्रेस महामंडळाचे संयुक्त महाव्यवस्थापक दुर्गा प्रसाद यांनी यासंद्रभात मंजुरीचे पत्र पाठवले. 

या मदतीसाठी महामंडळाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक तृप्ती पात्रा- घोष, संचालक एस. के. सिन्हा, अजयकुमार अग्रवाल, आयएसपीचे मुख्य व्यवस्थापक सुधीरकुमार साहू यांचे मजदूर संघाने आभार मानले आहे. 

यापूर्वी प्रेसने `सीएसआर`मधून गतवर्षी एक कोटीचा निधी जिल्हा रुग्णालयाला दिला होता. गेल्या दीड महिन्यांपासून राज्यात करोनाचा प्रकोप वाढला आहे. नाशिकमध्ये सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये गर्दी वाढत आहे. अनेकदा ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्ण व नातेवाईकांना भटकावे लागते. वेळेत ऑक्सिजन न मिळाल्यामुळे विविध रुग्णालयांतील रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या  आहेत. याची दखल घेत खासदार हेमंत गोडसे यांनी भारत प्रतिभूती मुद्रणालयाच्या अधिका-यांशी चर्चा केली. प्रेसच्या सीएसआर फंडातून देवळाली कॅन्टोमेन्ट बोर्ड तसेच सिन्नर व इगतपुरीतील सरकारी रुग्णालायांमध्ये आक्सिजन प्रकल्प उभारणीसाठी मदत करण्याची विनंती केली. त्यास प्रेसने सकारात्मक प्रतिसाद दिला.

...

सध्या कोरणाचा महामार्गामुळे सामाजिक जबाबदारी म्हणून प्रेस ने सीएसआर फंडातून ऑक्सिजन प्रकल्पाला मदत मिळावी म्हणून पाऊल उचलले आहे सध्या गरजवंत कामासाठी हा पैसा खर्च होत असल्याचे समाधान वरिष्ठांना पासून सर्वच प्रेस कामगार बांधवांना आहे त्याचा लाभ सर्वच क्षेत्रातील रुग्णांना होणार आहे.
- ज्ञानेश्वर जुंद्रे, कामगार नेते.
.... 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख