जळगाव शिवसेनेत फटाके; गुलाबरावांवर शिवसेना आमदाराचे आरोप - Internal disputes bitween jalgao shivsena leaders, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

जळगाव शिवसेनेत फटाके; गुलाबरावांवर शिवसेना आमदाराचे आरोप

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 जुलै 2021

मी गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेत आहे. मात्र आता मी आमदार असूनही स्थानिक पातळीवर मला कोणत्याच गोष्टीसाठी विचारात घेतले जात नाही. मी पक्ष सोडून जावे यासाठी मला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह स्थानिक नेते त्रास देत आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार चिमणराव पाटील यांनी आज केला.

जळगाव : मी गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेत आहे. ( I am in shivsena from last 25 years) मात्र आता मी आमदार असूनही स्थानिक पातळीवर मला कोणत्याच गोष्टीसाठी विचारात घेतले जात नाही. (Now nobody take in confidence) मी पक्ष सोडून जावे यासाठी मला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह स्थानिक नेते त्रास देत आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांनी आज केला. 

त्यांच्या आरोपामुळे जळगाव जिल्हा शिवसेनेत गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे. आता हा वाद उघडपणे समोर आल्याने जळगाव शिवसेनेत फटाके फुटु लागेल आहेत. 

शिवसेनेचे पारोळा येथील आमदार व जिल्हा बँकेचे संचालक चिमणराव पाटील यांनी यासंदर्भात जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, पक्षात मला विनाकारण स्थानिक नेते त्रास देत आहेत. मी पक्षातून बाहेर जावे असे वातावरण निर्माण केले जात आहे. आता पक्षात नुकतीच नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. त्याने माझ्या तालुक्यात नवीन जिल्हाप्रमुख दिला. याबाबत मला साधे विचारले देखील नाही. वर्तमानपत्रातील बातमीतून आपल्याला ही माहिती मिळाली. शासकीय निधि वितरणात देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील आपणास हेतुपुरस्सर डावलतात असा आरोपही त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, आपला वरिष्ठ नेत्यांवर राग नाही. परंतु स्थानिक पातळीवर नेते त्रास देत आहेत. याची माहिती आता आपण वरिष्ठ नेत्यांना दिली आहे. त्यांच्यावर वरिष्ठ नेते कारवाई करतील याची आपण प्रतीक्षा करीत आहोत. आपण कट्टर शिवसैनिक आहोत. आपल्याला कितीही त्रास दिला तरी शिवसेना सोडणार नाही, असा दावा त्यांनी व्यक्त केला.
...

हेही वाचा...

व्वा माणिकराव, असा साधेपणा नाशिककरांनी पाहिला नव्हता!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख