आव्हान देण्याऐवजी शिवसेनेने सरकारकडून निधी आणून दाखवावा !

शहरातील सर्वच नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामे मार्गी लागणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने प्रयत्न आहे. उड्डाणपूल जरूर झाला पाहिजे, परंतु इतर विकासकामेदेखील तितकीच महत्त्वाची आहेत. आव्हाने देऊन राजकारण करण्यापेक्षा राज्य सरकारकडून नाशिकच्या विकासासाठी निधी आणण्याचे प्रयत्न करा.
badgujar-Kulkarni
badgujar-Kulkarni

नाशिक : शहरातील सर्वच नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामे मार्गी लागणे महत्त्वाचे आहे. (All Corporators devolopment work shall be goes on) त्या अनुषंगाने प्रयत्न आहे. उड्डाणपूल जरूर झाला पाहिजे, (Flyover is Must, But other devolopment also necessory) ) परंतु इतर विकासकामेदेखील तितकीच महत्त्वाची आहेत. आव्हाने देऊन राजकारण करण्यापेक्षा राज्य सरकारकडून नाशिकच्या विकासासाठी निधी आणण्याचे प्रयत्न करा असा पलटवार करताना आव्हाने द्या समर्थपणे पेलू, असे प्रतिआव्हान महापौर सतीश कुलकर्णी (Mayor Satish Kulkarni) यांनी शिवसेनेचे महानगरप्रमुख व ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना दिले.

त्रिमूर्ती चौक व मायको सर्कलच्या कामावरून शिवसेना व भाजपमध्ये शाब्दीक युद्ध सुरु आहे. महापौर कुलकर्णी यांनी आयुक्त कैलास जाधव यांना पत्र लिहून पुलांचे काम तत्काळ थांबविण्याची विनंती केल्यानंतर शिवसेनेचे बडगुजर यांनी संताप व्यक्त करत महापौरांनी पुलाचे काम थांबवून दाखवावे, असे आव्हान दिले.

या पार्श्‍वभूमीवर महापौर कुलकर्णी यांनी बडगुजर यांना उत्तर देत आव्हाने देण्यापेक्षा राज्य शासनाकडून निधी आणा असा सल्ला दिला. ते म्हणाले, शहरविकास आराखड्यात १९९३ पासून रिंग रोड विकास आराखड्यात समाविष्ट असतानाही अद्याप अपूर्ण असून, ते होणे गरजेचे आहे. सातत्याने या कामांचा समावेश करण्याची मागणी करत आहे, परंतु प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. प्रसंगी कर्ज उभारा परंतु अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रिंगरोड तयार होणे गरजेचे आहे. रिंगरोड झाल्यास पायाभूत सुविधा वाढतील त्यातून महसूल मिळेल. प्रभागांमध्ये कामांना सुरवात होणे गरजेचे आहे. उड्डाणपुलाला माझा विरोध नाही, परंतु इतर विकासकामे झाली पाहिजे.

आव्हाने द्या, समर्थपणे पेलू
भाजप नाशिकच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहे, विकासासाठी आमच्या बरोबर राहा, ही आजची गरज असल्याचे सांगताना आव्हाने द्या, ती आम्ही समर्थपणे पेलू असे महापौर म्हणाले. महापौर या नात्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी विकासकामांची मागणी केली आहे. त्यांच्या कामांकडे माझे लक्ष आहे. परंतु, महानगरप्रमुख म्हणून आपले काय, असा सवाल बडगुजर यांना करताना आपण फक्त उड्डाणपुलासाठीच आग्रह धरत आहात, ही भूमिका शहराच्या दृष्टीने न्याय देणारी आहे का, हे आपल्याच पक्षातील नगरसेवकांना विचारण्याचा सल्ला दिला. नाशिकमध्ये विकासकामांना कोणी ब्रेक लावत असेल तर ती नाशिककरांची फसवणूक आहे.

...
आव्हाने देण्यापेक्षा शहर विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पालिकेतील परसेवेतील अधिकाऱ्यांना नाशिकबरोबर किती बांधिलकी आहे, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. त्यामुळे विकासकामांसाठी सर्वपक्षीय साथ मिळाली पाहिजे.
- सतीश कुलकर्णी, महापौर. 
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com