व्यक्तिगत बदला घेण्याच्या प्रवृत्तीने राजकारण अधोगतीकडे

राजकारणामध्ये माणसाने विचारांची लढाई केली पाहिजे. पक्षाचा विचार लोकांना सांगा, ते विचार घेऊन लोक तुम्हाला लोकप्रतिनिधी करतील. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही जर कुणाचा व्यक्तिगत बदला घेण्यास निघाला असाल, तर मला वाटतंय राजकारण हे अधोगतीकडे जायला निघाले आहे.
Gulabrao Patil F
Gulabrao Patil F

यावल : राजकारणामध्ये माणसाने विचारांची लढाई केली पाहिजे. पक्षाचा विचार लोकांना सांगा, ते विचार घेऊन लोक तुम्हाला लोकप्रतिनिधी करतील. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही जर कुणाचा व्यक्तिगत बदला घेण्यास निघाला असाल, तर मला वाटतंय राजकारण हे अधोगतीकडे जायला निघाले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषी विकास योजना व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्या सहाय्याने क्लिनिंग ग्रेडिंग युनिट व गुदाम उभारण्यात आले आहे. या बांधकामाचा लोकार्पण व नामकरण सोहळा शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी खासदार रक्षा खडसे, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या धान्यासाठी चाळण व प्रतवारी यंत्रणा उभारली आहे. या प्रकल्पाचे माजी खासदार तथा माजी आमदार हरिभाऊ जावळे असे नामकरण करण्यात आले. पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते उदघाटन झाले.

या वेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे म्हणाले, की (स्व.) क्लिनिंग, ग्रेडिंग युनिट व गुदामामुळे हरिभाऊ जावळे यांच्या स्मृती सतत जिवंत राहतील. तर खासदार रक्षा खडसे म्हणाल्या, बाजार समितीकडून त्यांचे नाव युनिटला देऊन त्यांना खरी श्रद्धांजली वाहिली आहे.

यावेळी  मसाका चेअरमन शरद महाजन, नगराध्यक्ष नौशाद तडवी, माजी नगराध्यक्ष सुरेखा कोळी, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, बाजार समितीचे सभापती तुषार (मुन्ना) पाटील, उपसभापती उमेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य सविता भालेराव, भाजप ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष हर्षल पाटील, जिल्हा बँकेचे संचालक गणेश नेहते, कृषिभूषण नारायण चौधरी, बाजार समितीचे संचालिका कांचन फालक, पुरुजित चौधरी, भाजप तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, शहराध्यक्ष नीलेश गडे, शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, तुषार (मुन्ना) पाटील, प्रा. जतीन मेढे उपसभापती उमेश पाटील उपस्थित होते.
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com