मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती; `झेडपी` अधिकाऱ्यावर थेट गुन्हा ! 

"कोरोना' संदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चुकीची माहिती दिल्याने जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात वरिष्ठांनी तसे निर्देश दिल्याने जिल्हा परिषद प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे.
मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती; `झेडपी` अधिकाऱ्यावर थेट गुन्हा ! 

नाशिक : "कोरोना' संदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चुकीची माहिती दिल्याने जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात वरिष्ठांनी तसे निर्देश दिल्याने जिल्हा परिषद प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे. यानिमित्ताने सौम्य प्रकृतीचे "सॉफ्ट' मुख्यमंत्री ही उद्धव ठाकरे यांची प्रतिमा बदलण्यास सुरवात झाली आहे. विशेषतः प्रशासनाने यासंदर्भात चांगलीच धास्ती घेतली आहे. 

राज्य शासनाने नुकतच "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या कार्यक्रमाची घोषण ाकेली आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला नियंत्रणात आनण्यासाठी हा महत्वाकांक्षी कार्यक्रम म्हणून त्याकडे पाहिले जाते. यासंदर्भात नुकतीच नाशकि जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांची व्हर्च्युअल बैठक झाली होती. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने प्रशासन सतर्क आहे. त्यामध्ये प्रत्येक नागरिकाशी संपर्क करुन कोरोना संदर्भात त्याचे प्रबोधन करणे, घरोघर जाऊन तपासणी यांसह विविध उपक्रम राबविले जाणार आहे. या बैठकीत प्रशासनाने गांभिर्याने कार्यरत होऊन सर्व यंत्रणा गतिमान करण्याच्या सुचना दिल्या होत्या. यासंदर्भात झालेल्या व्हीडीओ कॉन्फ्रसिंगमध्ये सादर केलेल्या माहितीवरुन हा गोंधळ पुढे आला. 

यासंदर्भात झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी दिलेली माहिती खरी नव्हती. त्याची खातरजमा केल्यावर वरिष्ठांच्या हे लक्षात आले. श्री. शिंदे "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या उपक्रमात कार्यरत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत व एका गंभिर विषयावर सदोष माहिती दिल्याने, वरिष्ठांनी त्याची दखल घेतली. त्यांच्यावर या उपक्रमात काम करतांना कामात हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन कक्षातील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यावर प्रशासकीय कामकाजासंदर्भात गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे प्रशासनातील सर्वच अधिकारी अधिक गांभिर्याने कामात लक्ष घालत आहेत. 
... 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=L7Bqo_Br3akAX9SkCWm&_nc_ht=scontent-sin6-2.xx&oh=728c2ec1929f72bdfd07eccae4909877&oe=5F97CFA7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com