नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत देणार 

आम्हाला जेव्हा निवडणुका लढायच्या तेव्हा पक्षीय विचार करू, मात्र शेतकरी हितासाठी आम्ही सर्व एकत्र आहोत. याच एकोप्याच्या भावनेतून तालुक्यात नुकसान झालेले शेतकरी आणि नागरिकांना तत्काळ नुकसान भरपाई मिळणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी-पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना ते बोलत होते.
Gulabrao Patil Mahajan
Gulabrao Patil Mahajan

जामनेर : आम्हाला जेव्हा निवडणुका लढायच्या तेव्हा पक्षीय विचार करू, (Will think political ideology in election) मात्र शेतकरी हितासाठी आम्ही सर्व एकत्र आहोत. (but in the intrest of farmers we all are one) याच एकोप्याच्या भावनेतून तालुक्यात नुकसान झालेले शेतकरी आणि नागरिकांना तत्काळ नुकसान भरपाई मिळणार (Immediate relief will be given to farmers) असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली. तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी-पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना ते बोलत होते.

तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. पालकमंत्री श्री. पाटील हे त्यावेळी मुंबईत होते, तेव्हाच त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आधीच निर्देश दिलेले होते. जिल्ह्यात आल्यानंतर पालकमंत्र्यांनी शुक्रवार) तालुक्यातील ओझर-ओझरवाडी, हिंगणे नक, तोंडापूर आदी ठिकाणी नुकसानग्रस्तांची भेट घेतली. त्यांनी नुकसान झालेल्या नागरी भागाची पाहणी करून आपत्तीग्रस्तांना धीर देत राज्य शासन त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत तत्काळ मदतीचे आश्‍वासन दिले.

याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, की तालुक्यात वादळी पावसाने सुमारे चार हजारांहून अधिक हेक्टरवरील पिकांची हानी झाल्याचा अंदाज असून, सुमारे तीनशेपेक्षा जास्त घरांची पडझड व पत्रे उडाली. या आपत्तीत केळी, मका, कपाशी आदी पिके उद्ध्वस्त झालेली आहेत. मुक्ताईनगर, सावदा, रावेर आदी परिसरातील झालेल्या नुकसान भरपाईचे पैसे आता सरकारकडून देण्यात आलेले आहेत. याच धर्तीवर चाळीसगाव आणि जामनेर तालुक्यातील आपत्तीग्रस्तांना तत्काळ मदत देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी या संदर्भात मुद्दा उपस्थित केला. यावर मदत व पुनर्वसनमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ मदतीचे अधिकार असल्याचे नमूद करत त्यांना याबाबत निर्देश दिले आहेत.

दरम्यान, पाहणी दौऱ्यात पालकमंत्री हे भाजपचे माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्यासोबत पाहणी करत असल्याबद्दल विचारणा केली असता, पालकमंत्री पाटील म्हणाले, की शिष्टाचारानुसार पालकमंत्री जेव्हा नुकसानीची पाहणी करतात, तेव्हा त्या तालुक्याचे आमदार आणि सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेतात. आम्ही गेल्या आठवड्यात याच प्रकारे चाळीसगाव तालुक्यात पाहणी केली होती. याच प्रकारे सर्व पक्षाच्या नेत्यांसोबत जामनेरात पाहणी करत आहोत. कोण कोणत्या पक्षाचा हा मुद्दा गौण आहे.

पाहणी दौऱ्यात पालकमंत्र्यांसोबत गिरीश महाजन, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजय गरूड, भाजपचे दिलीप खोडपे, तालुका उपजिल्हाप्रमुख डॉ. मनोर पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजित पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख नीळकंठ पाटील, उपसंघटक सुधाकर सराफ, शहरप्रमुख अतुल सोनवणे, कैलास माळी, भूषण ललवाणी, दीपक माळी, ॲड. भरत पवार, राष्ट्रवादीचे शहरप्रमुख जितेश पाटील, राष्ट्रवादी युवा शहरप्रमुख विनोद माळी, कॉंग्रेसचे शंकर राजपूत, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष एस. टी. पाटील, मूलचंद नाईक, गणेश झाल्टे आधी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
...
हेही वाचा....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com