बंडातात्या, मंदिरे उघडल्यावर वारकरी तर सुरक्षीत राहिले पाहिजेत! - If Temples Open, will warkari be safe from COVID-19 | Politics Marathi News - Sarkarnama

बंडातात्या, मंदिरे उघडल्यावर वारकरी तर सुरक्षीत राहिले पाहिजेत!

संपत देवगिरे
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर हे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ आहेत. मात्र त्यांमा मंदिरांबाबत राज्य सरकारविषयी वापरेली भाषा अत्यंत चुकीचे आहे.मंदिरे उघडल्यावर भाविक आणि वारकरी तर सुरक्षित राहिले पाहिजेत, असे येथील वारकरी सेवा समितीचे अध्यक्ष अमर ठोंबरे यांनी म्हटले आहे.

नाशिक : ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर हे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ आहेत. मात्र त्यांमा मंदिरांबाबत राज्य सरकारविषयी वापरेली भाषा अत्यंत चुकीचे आहे. मंदिरे उघडून करणार काय? मंदिरे उघडल्यावर कोरोनाचा प्रसार झाल्यास वारकरी तर सुरक्षित राहिले पाहिजेत, असे येथील वारकरी सेवा समितीचे अध्यक्ष अमर ठोंबरे यांनी म्हटले आहे. 

कोरोनामुळे देशातील विविध राज्यांतील मंदिरे बंद आहेत. महाराष्ट्रात देखील मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. याबाबत भारतीय जनता पक्षाकडून देखील मंदिरे उघडण्याबाबत आंदोलन सुरु आहेत. सरकारवर टिका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नुकतेच ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राज्य सरकारला रावण, नरकासुराची उपमा दिली होती. त्यावर येथील वारकरी संप्रदायातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वारकरी अध्यात्मिक विचार, प्रेम, सदभावना याचा प्रसार करतात. समाजात बंधुभाव निर्माण करतात. ते शक्यतो राजकीय भूमिकेतून कोणावर टिका करणे  टाळतात. मात्र बंडातात्यांनी ही सीमा ओलांडली. ते ज्येष्ठ आहेत, त्यामुळे त्यांनी हे टाळले पाहिजे होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे उघडण्याबाबत सरकारची काही भूमीका आहे. त्यानुसार मंदिरे उघडण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सुतोवाच केले आहे. त्यामुळे त्या निर्णयाची सर्वांनी वाट पाहिली पाहिजे.

श्री. ठोंबरे म्हणाले, दर्शनबारी उघडल्यास त्यातून होणारी गर्दी, वारकरी दर्शना आल्यावर त्यांच्या गाठीभेटी यातून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका आहे. बहुतांश वारकरी शेतकरी व ग्रामीण भागातील असतात. त्यांनी कोरोना प्रतिबंधाबाबत उदासिनता दाखविल्यास कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. अशा स्थितीत मंदिरे उघडल्यास महाराष्ट्रातील वारकरी तरी शिल्लक राहिले पाहिजेत. निरोगी राहिले पाहिजेत. त्यामुळे घाई न करता संयमाने शासनाच्या निर्णयाची वाट पाहिली पाहिजे.
....
 
 

https://developers.facebook.com/docs/plugins/embedded-posts/?prefill_hre...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख