`ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी प्रयत्न करणार - I Will see that OBC Reservation shall not be desturb | Politics Marathi News - Sarkarnama

`ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी प्रयत्न करणार

संपत देवगिरे
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी प्रयत्न करीन  असे प्रतिपादन  राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिक : समता परिषद फुले, शाहू, आंबेडकर यांच्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येकाची आहे. मी अनेक वर्षे `ओबीसी`साठी लढलो. यापुढे देखील लढणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी प्रयत्न करीन  असे प्रतिपादन  राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या सभागृहात झाली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, महात्मा फुले यांचा विचार घेऊन उभे राहणारा प्रत्येक कार्यकर्ता मला हवा आहे. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गावो गावी काम केले पाहिजे. समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले. 

ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कोणाचाही विरोध नाही पण हे आरक्षण `ओबीसीं`च्या कोट्यातून नको. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी समाजाची मागणी आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे मत देखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

श्री. भुजबळ यावेळी म्हणाले, समता परिषदेच्या स्थापना झाली त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी गावो-गावी जाऊन परिषदेचे काम केले. आता सुद्धा कार्यकर्त्यांनी समाजात जाऊन काम केले पाहिजे. जिल्हाध्यक्षांनी तालुकाप्रमुख, गावप्रमुख्यांच्या नेमणूक करण्यात याव्यात. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. समाजात सोशल मिडीयाचा वापर वाढतो आहे, मात्र सोशल मीडियाचा वापर हा फुले शाहू आंबडेकरांचा विचार पसरवण्यासाठी देखील करावा. 

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, प्रा. हरी नरके, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, शिवाजीराव नलावडे, डॉ. कैलास कमोद, प्रा. दिवाकर गमे, मुंबई शहराध्यक्ष सदानंद मंडलिक, डॉ डी. एन. महाजन, अॅड सुभाष राऊत, रवींद्र पवार, दिलीप खैरे, डॉ गणेश खारकर, प्रा. नागेश गवळी आदी उपस्थित होते
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख