एकनाथ खडसेंचा इलाज मलाच करावा लागेल !

जळगाव जिल्ह्यात आज माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याविषयी जामनेर येथील एक ध्वनीफीत आज सोशल मीडियावर व्हायरल झाली. यासंदर्भात श्री महाजन चांगलेच संतापलेले दिसले. यामागे कोणाचा हात आहे, हे मला माहिती आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांचा इलाज मलाच करावा लागेल, असा सज्जड दमच त्यांनी देऊन टाकला.
Mahajan- Khadse
Mahajan- Khadse

नाशिक : जळगाव जिल्ह्यात आज माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याविषयी जामनेर येथील एक ध्वनीफीत आज सोशल मीडियावर व्हायरल झाली. यासंदर्भात श्री महाजन चांगलेच संतापलेले दिसले. यामागे कोणाचा हात आहे, हे मला माहिती आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांचा इलाज मलाच करावा लागेल, असा सज्जड दमच त्यांनी देऊन टाकला. 

श्री महाजन यांचा मतदारसंघ असलेल्या जामनेर येथील एका मुलाने केलेल्या विधाने व दुरध्वनीवरील संभाषणाची ध्वनीफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. ही फित राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. या पार्श्वभूमीवर श्री. महाजन आज नाशिकच्या दौऱ्यावर होते. त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी राज्य सरकार कोरोना हाताळम्यात अपयशी ठरले असा आरोप केला. यावेळी पत्रकारांनी त्यांना जळगाव येथील व्हायरल झालेल्या ऑडीओ क्लीपविषयी विचारणा केली. 

त्यावर ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत असलेल्या व्यक्तीनं एका शाळकरी मुलाशी कसं बोलायला हवं? याचे भानही त्यांना राहिलेले नाही असे दिसते. किमान त्यांनी याचा त्यांनी विचार करायला हवा होता. या घटनेवरून एकनाथ खडसे राजकीयदृष्ट्या एकनाथ खडसे वैफल्यग्रस्त झाल्याचे दिसते. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे आता मला त्यात लक्ष घालावच लागेल. श्री. खडसेंचा इयांचा लाज मलाच करावा लागेल.
...    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com