मी भाजपशी एकनिष्ठ, अफवा पेरणाऱ्यांची कीव वाटते!

मी भाजपचा जबाबदार पदाधिकारी आहे. स्थायी समिती सभापती या महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे. प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांशी माझे वैयक्तिक संबंध आहेत. रविवारी वैयक्तिक कामानिमित्त संबंधीत हॉटेलमध्ये गेलो होते. योगायोगाने तीथे खासदार संजय राऊत तीथे असल्याचे समजले. हा निव्वळ योगायोग होता, असे भाजपचे नेते गणेश गिते यांनी सांगितले.
Ganesh Gite
Ganesh Gite

नाशिक :  मी भाजपचा जबाबदार पदाधिकारी आहे.( I am Responsible BJP Office bearer)  स्थायी समिती सभापती या महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे. प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांशी माझे वैयक्तिक संबंध आहेत. (I have Good relations with Officers) रविवारी वैयक्तिक कामानिमित्त संबंधीत हॉटेलमध्ये गेलो होते. योगायोगाने तीथे खासदार संजय राऊत तीथे असल्याचे समजले. हा निव्वळ योगायोग होता, असे भाजपचे नेते गणेश गिते (Ganesh Gite) यांनी सांगितले.  

ते म्हणाले, काही असंतुष्ट पदाधिकाऱ्यांकडून माझ्याबद्दल गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र ते असत्य असल्याने विरोधक कधीही यशस्वी होणार नाहीत. 

श्री. गिते म्हणाले, मी रविवारी दुपारी हॉटेलमध्ये माझ्या वैयक्तिक कामासाठी गेलो होतो. त्याचवेळी खासदार राऊत तेथे असल्याचे समजले. मात्र, शिवसेनेतील  मला श्री. राऊत यांना भेटायचेच असते, तर मुंबईत जाऊन भेट घेता येऊ शकते, त्यासाठी नाशिकमध्ये स्थानिक नेत्यांसमोर भेट घेण्याची आवश्‍यकता नाही. हे कुठल्याही राजकीय कार्यकर्त्याला सहज कळते.

ते पुढे म्हणाले, शिवसेना संपर्कनेते संजय राऊत यांची गुप्त भेट घेतली, असे शिवसेनेत फारशी  किंमत नसलेल्या नेत्याने अफवांचे बाण फेकले असावेत. मुळात अशी गुप्त भेट घ्यायची असती, तर नाशिकपासून तीन तासांवर असलेल्या मुंबईची आम्ही निवड केली असती. नाशिकमध्ये भेट घेतल्यानंतर त्यांची चर्चा होणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे अशी चर्चा घडवून आणण्याइतके आम्ही मूर्ख नाही. 

मी भारतीय जनता पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असून, पक्षाने मला सलग दुसऱ्यांदा सभापतीची संधी दिली आहे. त्यामुळे अशा चर्चांना मी भीक घालत नाही. माझी निष्ठा माझ्या पक्षश्रेष्ठींना चांगली माहीत आहे. एखाद्या पक्षाचा नेता एखाद्या हॉटेलमध्ये उतरला असेल, तर त्या हॉटेलमध्ये अन्य राजकीय नेत्यांनी जाणे टाळले पाहिजे का? या ठिकाणी गेलो म्हणजे संबंधित नेत्याची भेट घ्यायलाच गेलो, असा अर्थ कसा काढू शकतात. उद्या  योगायोगाने अशी भेट घडली,  तर  असा राजकीय दुजाभाव करणारे आम्ही नक्कीच नाही. शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र, त्यातून कोणी वेगळा अर्थ काढला नाही व समजूतदार राजकीय व्यक्तींनी तर काढू नये, असा राजकीय मूर्खपणा भाजपमधील समजूतदार आणि सद्सद्विवेकबुद्धी ठेवणारे कार्यकर्ते कधी करू शकणार नाहीत, याची नोंद अफवा पसरवणाऱ्यांनी घ्यावी.


योग्य वेळी उत्तर मिळेल : शहाणे
स्थायी समिती सभापती गणेश गिते व मी शिवसेना संपर्कनेते संजय राऊत यांची भेट घेतल्याची निरर्थक बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. मुळात शिवसेनेत सध्या अस्वस्थ असलेल्या व गटबाजी करणाऱ्या एका पदाधिकाऱ्याची ही करामत आहे. पक्षश्रेष्ठींचा आमच्यावर विश्वास असून, वाघाच्या जबड्यात हात घालून परत येण्याची आमची हिंमत आहे. एखादं-दुसऱ्या नेत्यांची भेट घेतली म्हणजे संबंधित पक्षामध्ये प्रवेश केला, असा अर्थ काढणे चुकीचे आहे. बाकी शहाण्यांना शब्दाचा मारा पुरेसा. योग्य वेळी उत्तर दिले जाईल, असे भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com