नरेंद्र मोदींना पाकिस्तानधार्जीना कांदा चालतोच कसा?  - Hpw Modi agrres with Pak supprter Onion against Farmer | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

नरेंद्र मोदींना पाकिस्तानधार्जीना कांदा चालतोच कसा? 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

"मेक इन इंडिया' आत्मनिर्भर भारत, "बी व्होकल फॉर द लोकल' या घोषणा म्हणजे सरकारचे जुमले होते का?, असा प्रश्‍न शेतकरी नेते हंसराज वडघुले यांनी केला आहे. 

नाशिक : कांदा शेतकऱ्यांचा घता करण्यासाठी केंद्र सरकारने पाकिस्तान धार्जीण्या तुर्कस्तानचा कांदा आयात केला आहे. त्यामुळे केंद्र सरकार भारतीय शेतकऱ्यांना शत्रु मानते का? असा प्रश्‍न निर्माण होतो. "मेक इन इंडिया' आत्मनिर्भर भारत, "बी व्होकल फॉर द लोकल' या घोषणा म्हणजे सरकारचे जुमले होते का?, असा प्रश्‍न शेतकरी नेते हंसराज वडघुले यांनी केला आहे. 

तुर्कस्तान, अफगानीस्तान आणि पाकिस्तान धार्जीन्या देशांचा कांदा भारतात दाखल झाला आहे. हा कांदा मुंबईतील प्रमुख व्यापाऱ्यांनी घेण्यास नकार दिला होता. तरीही हा कांदा थेट कांद्याची पंढरी असलेल्या पिंपळगाव बसवंत बाजारात दाखल झाला. नाशिकच्या कांद्यात मिसळून त्याची बाजारातरवानगी केली जात आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त आहे. यासंदर्भात श्री. वडघुले म्हणाले, भाजप समर्थक नेते सतत देशातील विरोधकांना पाकिस्तानात जाण्याचा इशारा देत असतात. मात्र आता ते भारतीय शेतकऱ्यांची कोंडी करण्यासाठी थेट पाकिस्तान धार्जीनी भुमिका घेत आहे. हा विरोधाभास आता शत्रु देश धार्जीन्या तुर्कस्तानचा कांदा घेणार नाही अशी भुमिका मुंबईतील व्यापारी घटकाने घेतली आहे. तरी सुद्धा हाच कांदा स्थानिक कांद्यांमध्ये मिसळून देशांतर्गत बाजारपेठेत पाठवण्याचा केंद्र सरकारचा अट्टाहास करत आहे. ग्राहकांना कांदा किरकोळ बाजारात आजही पन्नास ते साठ रुपये किलो दराने मिळत आहे. परदेशी कांदा सुद्धा किरकोळ बाजारात सरासरी याच दराने मिळणार आहे. मग परदेशी कांदा ग्राहकांसाठी की नाफेड आणि आयातदारांच्या "अर्थपुर्ण" हितासाठी?. कांदा दर पाडण्यासाठी केंद्र सरकारच्या हट्टामुळे शेतकरी संतप्त असुन केंद्र सरकारने शहाणपणाची भुमिका घेतील नाही तर असंतोषाचा उद्रेक होईल, असा इशारा शेतकरी नेते हंसराज वडघुले यांनी दिला आहे. 

तेजीत असलेले कांद्याचे दर पाडण्यासाठी केद्र शासनाने तुर्कस्तान, अफगाणिस्तान, इजिप्तसह परदेशातील कांद्याच्या आयातीला पायघड्या घातल्या. देशातील प्रमुख शहरातील बाजारपेठांत हा कांदा पोचला आहे. पिंपळगाव बाजार समितीतही तो आज विक्रीसाठी आला. पिंपळगाव बसवंत, लासलगावमध्ये तुर्की, अफगाणचा कांदा दाखल झाल्याने शेतकऱ्यांचा घात झाला आहे. अफगाणिस्तानच्या कांद्याचा आकार जम्बो आहे, तर तुर्कीचा कांदा उग्र वास व चवीत वांधा आहे. पिंपळगाव बसवंत व लासगावला सुमारे चारशे टन कांदा व्यापाऱ्यांनी परदेशातून आयात केला आहे. 

महाराष्ट्रातील नाशिक, नगर जिल्ह्यासह बेंगळुरू, इंदूर येथे मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. पावसाने लाल कांद्याची दाणादाण उडवून दिल्याने मोठी नासाडी झाली. लाल कांद्याचे आगमन लांबल्याने मागणी व पुरवठ्यातील तफावत वाढली व कांद्याचे दर सात हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोचले. कांद्याच्या तेजीला ब्रेक लावण्यासाठी केंद्र शासनाने अपशकून केला. थेट तुर्की, इजिप्त, अफगाणिस्तानमधून कांद्याच्या आयातीसाठी रेड कार्पेट टाकले आहे. 
... 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख