महापौर म्हणतात, कोरोनासाठी होमिओपॅथी, आयुर्वेदिक उपचार हवेत - Homeopathi, Aurved pathi also usefull in Corona, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

महापौर म्हणतात, कोरोनासाठी होमिओपॅथी, आयुर्वेदिक उपचार हवेत

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 मे 2021

शहरात करोनाची रुग्णसंख्या वाढू नये यासाठी होमिओपॅथी व आयुर्वेदिक उपचार केल्यास निश्चितच कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होईल. याबाबत राज्य शासनाने तातडीने महापालिकांना सुचना द्याव्यात अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली आहे. 

नाशिक : शहरात करोनाची रुग्णसंख्या वाढू नये यासाठी होमिओपॅथी व आयुर्वेदिक उपचार केल्यास निश्चितच कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होईल. याबाबत राज्य शासनाने तातडीने महापालिकांना सुचना द्याव्यात अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली आहे. 

यासंदर्भात त्यांनी १३ एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले होते. त्या अनुषंगाने महापौर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी कोरोना संकटकाळात होमिओपॅथी आयुर्वेदिक व युनानी त्याचे महत्त्व जगाला पटवून देण्याची हीच संधी आहे असे सुतोवाच केले होते. त्याकरिता त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शक सूचना तयार करून टाक फोर्सकडे देण्याबाबत त्यांनी आदेश दिला होता.

ते म्हणाले, आयुष मंत्रालयाने होमिओपॅथी आयुर्वेदिक या उपचार पद्धतीचा वापर ॲलोपॅथी उपचार कोरोना सारखे आजारामध्ये औषधाचे उपचार म्हणून उपयोग होऊ शकतो असे म्हटले आहे. कोरोना बाधित रुग्ण तसेच इतरांना कोरोना संसर्ग होऊ नये, याकरिता होमिओपॅथी व आयुर्वेदिक औषधांचा वापर केल्यास निश्चितच रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होते याबाबत नाशिक शहरातील होमिओपॅथी व आयुर्वेदिक तज्ञ यांचे मतानुसार साधारण सौम्य लक्षणे असलेले कोरोना रुग्ण हे निश्चितच बरे होतील. त्यांना गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागत नाही, असे तज्ञांचे ठाम मत आहे. शहरातील होमिओपॅथी तज्ञांनी आत्तापर्यंत हजारो रुग्णांना या उपचाराद्वारे बरे केलेले आहे.

ते पुढे म्हणाले, सद्यस्थितीत देशांमधील इतर राज्यांचा विचार करता महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना  ॲलोपॅथी उपचाराबरोबरच होमिओपॅथी व आयुर्वेदिक औषधे दिल्यास रुग्णांवर या औषधांचा कोणताही साईड इफेक्ट न होता ते रुग्ण लवकरात लवकर बरे होऊ शकतात. त्यानुसार ऍलोपॅथी बरोबर होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अवलंब करण्याबाबत मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांना पत्र दिले होते. त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. त्यांनी याबाबत महापालिका प्रशासनास आदेश करण्याबाबत कळविले आहे. या पत्राची मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतली. 
...
हेही वाचा...

शिवसेनेच्या नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचे कोरोनाने निधन

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख