स्मार्टसिटीच्या प्रत्येक कामांची चौकशी करावी - Hemlata patil deemand inquiry of all smart city works, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

स्मार्टसिटीच्या प्रत्येक कामांची चौकशी करावी

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 30 जून 2021

स्मार्टसिटीच्या कामांचा लेखाजोखा मांडण्यासाठी झालेल्या विशेष महासभा म्हणजे ‘तू मारल्या सारखे कर, मी रडल्या सारखे’, अशी आहे. महापौरांना खरच स्मार्टसिटीच्या विषयाचे गांभीर्य असेल, तर त्यांनी स्मार्टसिटीच्या बैठकांचे इतिवृत्त महासभेवर ठेवून त्यातील प्रत्येक कामांची चौकशी करावी

नाशिक : स्मार्टसिटीच्या कामांचा लेखाजोखा मांडण्यासाठी झालेल्या विशेष महासभा म्हणजे ‘तू मारल्या सारखे कर, मी रडल्या सारखे’, (General body meeting on Smart city is Proxy) अशी आहे. महापौरांना खरच स्मार्टसिटीच्या विषयाचे गांभीर्य असेल, (If Mayor is serious he should present Chronicle report) तर त्यांनी स्मार्टसिटीच्या बैठकांचे इतिवृत्त महासभेवर ठेवून त्यातील प्रत्येक कामांची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका डॉ. हेमलता पाटील (Dr Hemlata Patil) यांनी केली. 

विशेष महासभेनंतर प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात त्या म्हणाल्या, की विशेष महासभेत स्मार्टसिटीच्या कामकाजाची चर्चा झाली. अशी चर्चा यापूर्वीदेखील झाली आहे. त्या महासभेत अधिकाऱ्यांना परत पाठविणे व त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले गेले. मात्र, त्याचा किंचित फरक यंत्रणेवर झाला नाही. 

आज विशेष महासभेच्या माध्यमातून पुन्हा शेलक्या विशेषणासोबत चर्चा झाली. स्मार्टसिटी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याची तसदीदेखील घेतली नाही. सभेत आत्तापर्यंत स्मार्टसिटीच्या जेवढ्या सभा झाल्या, त्याचे इतिवृत्त महासभेवर ठेवावे. जेणेकरून पाणी नक्की कुठे मुरतंय ते समजेल, ही एक मागणी होती. स्मार्टसिटीच्या विषयपत्रिकेवर नेमके कोणते विषय असतात. त्यांना मंजुरी देणे, विहित मुदतीत काम झाले नाही तर मक्तेदाराला दंड करणे, तोच दंड परत त्याच विषयपत्रिकेवर माफ करणे असे विनोदी प्रकार कोणाच्या संमतीने घडतात, याची माहिती महासभेला होणे गरजेचे आहे. 

महासभेच्या माध्यमातून नगरसेवकांच्या काठीने साप मारण्याचा प्रकार तर नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार व महापालिकेचा पैसा नक्की कुठे मुरतोय, या स्मार्टसिटीवर नक्की कुणाचा अंकुश आहे, ज्या महासभेवर या कारभाराची चौकशी होण्यासाठी नगरसेवक घसे फोडत आहेत त्यांच्याकडे स्मार्टसिटी मीटिंगची कार्यपत्रिका आहे का, असा सवाल करताना महापौरांना जर खरच स्मार्टसिटीविषयाचे गांभीर्य असेल तर बैठकांचे इतिवृत्त महासभेवर ठेवून यातील प्रत्येक कामांची चौकशी करावी, असे डॉ. हेमलता पाटील यांनी म्हटले आहे. 
...
हेही वाचा...

`बीएचआर` घोटाळा; मुख्य सूत्रधार जितेंद्र कंडारे पोलिसांच्या ताब्यात

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख