आरोग्यदायी वातावरणामुळे नाशिक सेकंड होम  - healthy atmosphare make Nashik second Home. Chhagan Bhujbal. | Politics Marathi News - Sarkarnama

आरोग्यदायी वातावरणामुळे नाशिक सेकंड होम 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 31 जानेवारी 2021

स्वच्छ हवामानामुळे ‘सेकंड होम’ म्हणून नाशिकला पसंती मिळत आहे. नाशिकची आरोग्यदायी संपन्नता जपण्याची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकांसह नाशिककरांची आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

नाशिक : स्वच्छ हवामानामुळे ‘सेकंड होम’ म्हणून नाशिकला पसंती मिळत आहे. नाशिकची आरोग्यदायी संपन्नता जपण्याची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकांसह नाशिककरांची आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

क्रेडाई महाराष्ट्र संस्थेच्यावतीने झालेल्या राष्ट्रीय शिखर परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. श्री. भुजबळ म्हणाले, की व्यावसायिकतेला चालना देताना ‘क्रेडाई’ने सामाजिक दायित्वाचा भार उचलला आहे. कोविड काळात सरकारी वैद्यकीय सुविधांवर ज्यावेळी ताण निर्माण झाला. त्या वेळी ‘क्रेडाई’ने पुढाकार घेऊन कोविड सेंटर उभारले. कोविड सेंटरला कलात्मकतेची जोड देताना सुविधा उपलब्ध करून दिल्या. कोरोनाकाळात रस्त्यावर उतरून लढा देणाऱ्यांना मास्क, संरक्षण कीट, औषधांचे वाटप केले. बांधकाम व्यवसायाला चालना मिळण्यासाठी शासनाने अनेक सवलती दिल्या आहेत. ग्राहक, बांधकाम व्यावसायिकांना फायदा व्हावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. कोरोनानंतर बाजारात मरगळ आली आहे. त्यावर सरकार नक्कीच मात करेल. 

बांधकाम क्षेत्रासमोर आव्हाने 

यावेळी बोलताना शांतिलाल कटारिया म्हणाले, की गेल्या काही वर्षांत बांधकाम व्यवसायाला चांगले दिवस आले असले तरी या माध्यमातून अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. अशा वातावरणात तुमचा चेहरा हाच व्यवसायाचा ब्रॅन्ड बनवा. व्यवसाय व अर्थशास्त्राची सांगड घाला. व्यवसायातील होणारे बदल समजून घ्या. मोठी स्वप्ने पाहा, दुप्पट काम करा. 

यावेळी क्रेडाई राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, उपाध्यक्ष शांतिलाल कटारिया, सल्लागार समितीचे अध्यक्ष जितेंद्र ठक्कर, खजिनदार अनंत राजेगावकर, महाराष्ट्राचे अध्यक्ष राजीव पारिख, सचिव सुनील कोतवाल, क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष रवी महाजन, एएसके ग्रुपचे सुनील रोहोकले, साप्ताहिक ‘सकाळ’चे माजी संपादक सदा डुंबरे आदी उपस्थित होते.

परिषदेच्या यशस्वितेसाठी नाशिकचे उपाध्यक्ष कुणाल पाटील, गौरव ठक्कर, अनिल आहेर, सागर शहा, विजय चव्हाणके, सचिन बागड, राजेश आहेर, नरेंद्र कुलकर्णी, अतुल शिंदे, अनंत ठाकरे, हंसराज देशमुख आदींनी प्रयत्न केले.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख