हतनूर धरणचे 41 दरवाजे उघडल्याने नंदूरबारला पूराची स्थिती

संततधार पाऊस आणि तापीसह उपनद्यांना आलेल्या पुरामुळे नंदूरबार जिल्ह्यात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या पुरामुळे नदीकाठच्या गावांना सर्तकतेचे आवाहन करण्यात आले. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने काल रात्री धरणाचे 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहे.
Hatnur dam
Hatnur dam

नंदूरबार : संततधार पाऊस आणि तापीसह उपनद्यांना आलेल्या पुरामुळे नंदूरबार जिल्ह्यात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. (Due to heavy rains Tapi River bank under flood) या पुरामुळे नदीकाठच्या गावांना सर्तकतेचे आवाहन करण्यात आले. (due to Flood Administration issued alert notice) हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने काल रात्री धरणाचे 41 दरवाजे (41 gates of hatnur dam opens) पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहे. 

यासंदर्भात गेले दोन दिवस सुरु असलेला पाऊस तसेच कालच्या संततधारेने नद्यांना पूर आला आहे. विशेषतः तापी काठच्या गावांना त्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने रात्री दहा वाजता धरणाचे 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. तापी नदीपात्रात एक लाख सहा हजार 122 क्युसेक्स विसर्ग सुरु आहे. 

धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पुढील चौविस  तास आणि 48 तासांत पाण्याची आवक लक्षात घेता पाण्याची  पातळी नियंत्रित करण्यासाठी सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे प्रत्येकी एक दार रात्री 9.30 वाजता पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले.  प्रकल्पातून अनुक्रमे वीस हजार 497 आणि सोळा हजार 776 क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

हतनूर धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे. पाण्याचा येवा लक्षात घेता नदी पात्रात विसर्ग वाढू शकतो. तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com